‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच तालुक्यातून या खेळाडूंना मदतीचा ओघ सुरू झाला आहे
आवळी खुर्द येथील सानिका जाधाव व पंकज पाटील यांची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली. मात्र या दोघांचीही आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करून समाजातील दानशूर मंडळींना मदतीसाठी उद्युक्त केले आहे.
वृत्त प्रसिद्ध होताच काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील-कौलवकर यांनी आवळी खुर्द येथे जाऊन दोघांनाही पाच- पाच हजारांची मदत दिली आणी येथूनच मदतीचा ओघ सुरू झाला. त्यानंतर रवीश पाटील-कौलवकर यांनी दोघांचा सत्कार करून दोन्ही मुलांना श्रीलंकेला जाण्यासाठी लागणारा विमानखर्च उचलण्याची घोषणा केली. ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले. शिवाय राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी पंचवीस हजार रुपये रोख दिले.
चौकट १ ‘लोकमत’चे मानले आभार !
खेळाडूंसाठी संपूर्ण आवळी खुर्द गाव एकवटला असून ‘लोकमत’च्या बातमीनेच हे शक्य झाल्याने गावाने ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.
फोटो
सानिका जाधव व पंकज पाटील यांना मदत देताना राहुल पाटील. सोबत रवीश पाटील-कौलवकर, सभापती सोनाली पाटील, दीपाली पाटील, पांडुरंग भांदिगरे, आदी उपस्थित होते.