शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-सातारा कॉँग्रेस स्वबळावर लढणार

By admin | Updated: October 23, 2016 00:52 IST

े. सांगलीतून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील उपस्थित होते.

सांगली : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची जागा काँग्रेसला दिली नाही, तर ही जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय शनिवारी काँग्रेसच्या मुंबई येथील बैठकीत घेण्यात आला. दोन्ही जिल्ह्यांतील नेत्यांनी याबाबतचा आग्रह धरल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. अन्य ठिकाणच्या जागांबद्दल आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असले तरी, यातील बहुतांश जागांवर स्वबळाचाच आग्रह स्थानिक नेत्यांकडून धरला जात आहे. मुंबईतील टिळक भवनात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आ. मधुकरराव चव्हाण, खा. हुसेन दलवाई, भाई जगताप, आदी उपस्थित होते. सांगलीतून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील उपस्थित होते. सांगली-सातारा विधान परिषदेची जागा काँग्रेसने स्वबळावर लढवावी, अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची अपेक्षा असल्याचे सांगली-सातारा जिल्ह्यांतील नेत्यांनी अशोक चव्हाण यांना सांगितले. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे ही जागा काँग्रेसला देण्याची मागणी करण्यात येईल. त्यांनी या गोष्टीस नकार दिला, तर स्वबळावर काँग्रेस ही जागा लढेल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेच्या अन्य जागांविषयीसुद्धा नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वबळाची मागणी केली जात आहे. तरीही याविषयीचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेण्यात येईल, असे चव्हाण यांनी बैठकीत सांगितले. स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय मुंबईत झाल्यानंतर सांगलीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. काँग्रेसकडून इच्छुक असलेले जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त जाहीर केला. (प्रतिनिधी)चर्चेपूर्वीच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी उमेदवारीची घोषणा करून आघाडीचे संकेत मोडले आहेत. सांगली-सातारा विधान परिषदेच्या जागेचे गणित फिसकटले, तर अन्य जागांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. सध्यस्थितीत आघाडी तुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत, असे घडले तर दोन्ही पक्षांना कमी-अधिक तोटा होणार आहे. दोन्ही काँग्रेसमधील संघर्षाचा फायदा विरोधकांना होऊ शकतो. - विलासराव शिंदे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी