शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

सांगली उपांत्य फेरीत

By admin | Updated: December 23, 2014 23:40 IST

राज्य कबड्डी : पुण्याकडून रत्नागिरीचे आव्हान संपुष्टात

पुणे : महापौर चषक राज्य कबड्डी स्पर्धेत आज पुणे आणि सांगली या दोन्ही संघांनी विजयी घोडदौड कायम ठेवत पुरुष तसेच महिला गटांतून उपांत्य फेरीत धडक दिली. महिलांच्या गटात उपांत्य फेरीत पुणे-सांगली आणि मुंबई शहर-मुंबई उपनगर अशा लढती रंगणार आहेत.धनकवडी येथील तीन हत्ती चौकातील मैदानावर महिला गटात उपांत्यपूर्व फेरीमध्ये पुणे संघाने रत्नागिरी संघाचे आव्हान ६९-१३ने संपविले. मध्यंतरालाच पुण्याच्या सायली केरीपाळे, लविना गायकवाड व आम्रपाली गलांडे यांनी आक्रमक खेळ करीत प्रतिस्पर्धी संघाला सर्वच आघाड्यांवर नामोहरम केले आणि ६ लोण लावत तीन बोनस वसूल केले. त्यांना अंकिता मोहोळ, पूजा शेलार व किशोरी शिंदे यांनी चांगल्या पकडी करीत मोलाची साथ दिली. रत्नागिरीच्या स्मिता पांचाळ हिने चांगला खेळ केला. सांगली संघाने रायगडचा ४८-२९ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला सांगलीकडे ३१-७ अशी मोठी आघाडी होती. शीतल मोरे व गितांजली बनसे यांच्या चौफेर चढायांच्या जोरावर सांगलीने बाजी मारली. त्यांना पल्लवी जाधव व नेहा सांगलीकर यांनी सुरेख साथ दिली. रायगडच्या वैशाली पाटील व हेमांगी पाटील यांनी सांगलीच्या संघाला चांगली झुंज दिली. मुंबई शहर संघाने लौकीकाला साजेसा खेळ करीत औरंगाबाद संघाचा ४६-५ने धुव्वा उडविला. अनुभवी स्नेहल साळुंके व सुवर्णा बारटक्के विजयाच्या शिल्पकार ठरल्या. राजश्री पवार व राणी उपहार व अभिलाषा म्हात्रे यांच्या कामगिरीच्या जोरावर मुंबई उपनगर संघाने कोल्हापूरला ५६-५ने लोळवून अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवले. मध्यंतराला मुंबई उपनगर २९-३ने आघाडीवर होते. कोमल देवधर व मिनल जाधव यांनी चांगली पकड करीत विजयाला हातभार लावला. कोल्हापूरच्या अरूणा सावंत व शुभदा माने यांनी चांगला खेळ केला. पुरूष विभागात उपांत्यपूर्व लढतीत यजमान पुणे संघाने ठाणे संघावर २०-१५ने मात केली. मध्यंतराला पुणे संघाकडे ११-३ अशी आघाडी होती. अक्षय जाधव याने केलेल्या खोलवर चढाया व त्याला विकास काळे, शिवराज जाधव यांचे मिळालेले सहकार्य यामुळे पुण्याचा संघ बचाव व आक्रमण या दोन्ही आघाड्यांवर ठाण्यापेक्षा सरस ठरला. (क्रीडा प्रतिनिधी)नितीन, काशिलिंगचा धमाकासांगली जिल्हा संघाने बलाढ्य मुंबई शहर संघाला २४-८ने पाणी पाजून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. मध्यंतराला सांगली संघ १५-४ने आघाडीवर होता. सांगलीच्या भागश भिसे याने अष्टपैलू खेळ करीत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. स्टार खेळाडू नितीन मदने व काशिलिंग आडके यांनीदेखील जोरदार खेळ करीत प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळविली.