शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

संदीप कवाळे होणार ‘स्थायी’ सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 15:10 IST

महानगरपालिकेच्या आर्थिक चाव्या असलेल्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे संदीप शिवाजीराव कवाळे यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यानुसार सायंकाळी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कवाळे यांना चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, त्यानंतर सचिन पाटील यांना संधी देण्याचे ठरले आहे.

ठळक मुद्देसंदीप कवाळे होणार ‘स्थायी’ सभापतीमंगळवारी होणार निवडणूक : ‘परिवहन’साठी प्रतिज्ञा उत्तुरे

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आर्थिक चाव्या असलेल्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे संदीप शिवाजीराव कवाळे यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यानुसार सायंकाळी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कवाळे यांना चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, त्यानंतर सचिन पाटील यांना संधी देण्याचे ठरले आहे.स्थायी समितीच्या सभापतींसह परिवहन तसेच महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी अर्ज भरायचे होते. दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत स्थायी समिती सभापतीकरिता संदीप कवाळे यांनी अर्ज भरला. त्यांच्याविरोधात भाजपच्या विजयसिंह खाडे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

स्थायी समितीवर सत्तारूढ कॉँग्रेस-राष्ट्रवादी -शिवसेना यांचे वर्चस्व असल्यामुळे कवाळे यांच्या निवडीवर मंगळवारी (दि. ११) केवळ औपचारिक मोहोर उमटविण्याचे काम बाकी आहे.सत्तारूढ कॉँग्रेस-राष्ट्रवादी -शिवसेना आघाडीत ठरल्याप्रमाणे परिवहन समिती सभापतिपद हे शिवसेनेकडे राहणार असून, अपेक्षेप्रमाणे सभापतीसाठी आघाडीकडून प्रतिज्ञा उत्तुरे यांचे नाव आले. त्यांनी अर्ज दाखल केला; तर भाजप-ताराराणीकडून महेश वासुदेव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी काँग्रेसकडून शोभा कवाळे, तर भाजप-ताराराणी आघाडीकडून भाग्यश्री शेटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

उपसभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडून वहिदा सौदागर, तर भाजप-ताराराणी आघाडीकडून रूपाराणी निकम यांनी अर्ज भरला. तिन्ही सभापतींची निवडणूक मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दौलत देसाई असतील.

कवाळे, पाटील यांना चार-चार महिनेस्थायी समिती सभापतिपदाकरिता संदीप कवाळे व सचिन पाटील यांच्यात रस्सीखेच होते. त्यातच अजित राऊत यांनीही दावा केल्यामुळे चुरस अधिकच वाढली. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर झाला. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, अजित राऊत यावेळी उपस्थित होते.

यावेळी कवाळे व पाटील यांना संधी देण्याचा निर्णय झाला. ११ जून रोजी कवाळे यांनी राजीनामा द्यावा, असेही यावेळी ठरले. कवाळे यांनी राजीनामा दिल्यावर सचिन पाटील यांना सभापती करण्यात येणार आहे.

कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुमत अभेद्यगेल्या चार-साडेचार वर्षांत स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीतील एक अपवाद वगळता कॉँग्रेस-राष्ट्रवादी -शिवसेना आघाडी अभेद्य राहिली आहे. राज्यात भाजप सरकार असताना तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या दमनशक्ती असलेल्या राजकारण्यास कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी फोडता आली नाही.

आता तर राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यामुळे कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व अधिक घट्ट झाले आहे. आठ-नऊ महिन्यांनी तुलनेने कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडेच उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या मोठी असणार आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर