कागल : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने संकेश्वर ते बांदा या महामार्गास मंजुरी दिली आहे. त्याबद्दल केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी दिल्ली येथे भेटून आभार मानले. घाटगे यांच्या कार्यालयातून ही माहिती देण्यात आली.
बेळगाव, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून जाणारा संकेश्वर ते बांदा रस्ता व्हावा यासाठी समरजित घाटगे यांनी काही दिवसांपूर्वी. नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव हा दिला होता. संकेश्वर, गडहिंग्लज, आजरा, आंबोली, सावंतवाडी मार्गे बांदा येथे महामार्गाला मिळणार आहे. हा महामार्ग दळण-वळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच कागल मतदार संघातील ४२ गावांना या दळणवळणाचा लाभ होणार आहे, असे समरजित घाटगे यांनी म्हटले आहे.
फोटो कॅपशन
नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन समरजित घाटगे यांनी आभार व्यक्त केले.