शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात सनई, चौघड्यांच्या साथीने व्यवसाय सुरु, राजारामपुरीत रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 19:07 IST

CoronaVirus In Kolhapur : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या शंभर दिवसांहून अधिक काळ बंद असलेली कोल्हापूर शहरातील सर्वप्रकारची व्यावसायिक दुकाने सोमवारी सुरु झाली.

ठळक मुद्देकोल्हापुरात सनई, चौघड्यांच्या साथीने व्यवसाय सुरुराजारामपुरीत रॅली

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या शंभर दिवसांहून अधिक काळ बंद असलेली कोल्हापूर शहरातील सर्वप्रकारची व्यावसायिक दुकाने सोमवारी सुरु झाली.

प्रशासनाने निर्बंध उठवल्यामुळे राजारामपुरीत व्यापारी, दुकानदारांनी बैलगाडीतून सनई, चौघड्यांसह रॅली काढून व्यवसाय सुरु झाल्याचा आनंद व्यक्त केला. सर्व व्यवसाय सुरु झाल्याने अनेक दिवसांपासून रिकामे वाटणारे रस्ते वाहनांच्या गर्दीने फुलून गेले. सर्वत्र वाहतुकीची कोंडी झाली.कोल्हापूर जिल्ह्यात पहिली लाट ओसरल्यानंतर साधारणपणे नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये कोल्हापुरातील सर्व व्यवसाय सुरु झाले. परंतु, व्यावसायिक, व्यापारी यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. एप्रिलपासून कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्याने पुन्हा व्यवसाय बंद ठेवावे लागले. शासनाचे निर्बंध, जनता कर्फ्यू, संपूर्ण लॉकडाऊन अशा विविध कारणांनी गेल्या शंभर दिवसांहून अधिक काळ अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील अनेक दुकाने बंद होती. ती सुरु करावीत, असा व्यापाऱ्यांचा तगादा सुरु होता.

यासाठी निवेदने, गाठीभेटीद्वारे राज्य शासनाला विनंती करण्यात आली होती. परंतु, जोपर्यंत तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर जिल्हा येत नाही, तोपर्यंत प्रशासनाने व्यवसायाला परवानगी नाकारली होती.अखेर सोमवारपासून जिल्हा प्रशासनाने शहरातील निर्बंध आणखी शिथील केले आणि अत्यावश्यक, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह सरसकट सर्वच दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली. त्यामुळे व्यापारी, दुकानदारांमध्ये काहीसे उत्साहाचे वातावरण होते.

व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरु करण्यासाठी कालपासूनच तयारी सुरु केली होती. दुकानांच्या साफसफाईसह पूजेची तयारी केली होती. सोमवारी सकाळी व्यापारी, दुकानदारांनी पुन्हा असा प्रसंग येऊ नये, अशी भावना व्यक्त करत दुकानात पाऊल टाकले.राजारामपुरीत व्यापाऱ्यांची रॅली प्रशासनाने निर्बंध शिथील केल्यामुळे राजारामपुरीत सकाळी व्यापाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. व्यवसाय सुरु करण्यास परवानगी मिळाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ राजारामपुरी जनता बझार येथून रॅली काढण्यात आली. ही रॅली मुख्य मार्गावरुन मारुती मंदिर व परत बस रुटने गेली. रॅलीमध्ये सनई, चौघडा होता. व्यापाऱ्यांच्या हातात जनजागृती करणारे फलक होते.

राजारामपुरीत खरेदीसाठी येणाऱ्या ज्या ग्राहकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांच्यासाठी खास डिस्काऊंट देण्याचा निर्णय राजारामपुरीतील व्यापाऱ्यांनी घेतला असल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली. आमचा हा प्रयत्न व्यवसाय वाढीसाठी नाही तर लसीकरणाला प्रोत्साहन मिळावे म्हणून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर