शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

समीरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

By admin | Updated: October 24, 2015 01:06 IST

१२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. सांगली) याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत दि. ७ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली. शुक्रवारी त्याच्या कोठडीची मुदत संपल्याने राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांनी पानसरे हत्येच्या तपासासाठी समीरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करावी, अशी विनंती केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांनी हा आदेश दिला. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित गायकवाड याला दि. १६ सप्टेंबरला कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकून अटक केली. १२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली. दरम्यान, पानसरे हत्येप्रकरणी तपासकामात गायकवाड सहकार्य करीत नसल्याने त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी त्याची बे्रन मॅपिंग तपासणी करण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज पोलिसांनी सादर केला होता. त्यावर न्यायमूर्ती डांगे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संशयित आरोपीला ब्रेन मॅपिंग चाचणीसाठी संमती विचारली असता त्याने त्यास नकार दिला. त्यामुळे न्यायालयाने पोलिसांचा अर्ज फेटाळून लावीत गायकवाड याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा हजर करण्यात येणार होते. त्यानुसार दुपारी अडीच वाजता आरोपीचे वकील एम. एम. सुहासे, समीर पटवर्धन तसेच सरकारी वकील चंद्रकांत बुधले हे उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक देशमुख यांनी पानसरे हत्येचा तपास अपुरा असून, आरोपीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करावी, अशी विनंती केली. स्वत: आरोपी न्यायालयात हजर नसल्याने दोन्ही वकिलांनी युक्तिवाद मांडला नाही. त्यामुळे न्यायमूर्ती डांगे यांनी आरोपीला ७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. ओळख परेडचा अहवाल पोलिसांना सादरसंशयित आरोपी समीर गायकवाडची ओळख परेड करवीरचे तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांच्यासमोर कळंबा मध्यवर्ती कारागृहात झाली. यावेळी पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे, त्यांची मोलकरीण, शेजारी राहणारी व्यक्ती व शाळकरी मुलगा अशा चौघांसमोर ही ओळख परेड झाली. समीरसह बारा संशयितांना समोर उभे केले होते. यावेळी उमा पानसरे, मोलकरीण व शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने येथे तो माणूस उपस्थित नाही, असा जबाब दिला; परंतु चौदा वर्षांच्या मुलाने मात्र बारा संशयितांच्या चेहऱ्यावर नजर फिरवीत समीरवर रोखली आणि त्याच्या दिशेने बोट करून ‘हाच तो मारेकरी’ म्हणून ओळखले होते. या संपूर्ण ओळख परेडचा अहवाल तहसीलदार डॉ. खरमाटे यांनी बंद लखोट्यातून न्यायालयास सादर केला होता. तो अहवाल न्यायाधीश डांगे यांनी पोलिसांना दिला. हा अहवाल पोलीस दोषारोपपत्रामध्ये जोडणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)समीरच्या गैरहजेरीत सुनावणीसमीर गायकवाड हा कळंबा मध्यवर्ती कारागृहात आहे. शुक्रवारी त्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यासाठी कारागृह अधीक्षक सुधीर किंग्रे यांनी तपास अधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. परंतु चैतन्या यांनी समीरला न्यायालयात हजर करण्यासाठी पुरेसे पोलीस पथक उपलब्ध नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याला सुनावणीसाठी न्यायालयात हजर करता येत नाही, अशा विनंतीचे पत्र न्यायालयासह कारागृह प्रशासनास दिले होते. त्यामुळे समीरच्या गैरहजेरीत न्यायालयीन कोठडीची मुदतवाढ देण्यात आली.