शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

समीर गायकवाडचा जामिनासाठी अर्ज

By admin | Updated: April 28, 2017 00:00 IST

वरिष्ठ तपासी अधिकारी अनुपस्थित; १५ मे रोजी पुढील सुनावणी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कारागृहात असणारा संशयित आरोपी समीर गायकवाड याने जामीन मिळावा यासाठी गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीवेळी वकिलांमार्फत अर्ज दाखल केला.आजच्या सुनावणीवेळी सरकारी वकील शिवाजीराव राणे यांच्या नियुक्तीच्या आक्षेपाबाबतही म्हणणे मांडण्यास वरिष्ठ तपास अधिकारी उपस्थित नसल्याने न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे दि. १५ मे रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. त्या दिवशी समीरच्या जामीन अर्जाबाबत तसेच राणे यांच्या नियुक्तीबाबतही दोन्हीही बाजूंकडून म्हणणे मांडण्यात येणार आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर गुरुवारी ही सुनावणी झाली. अ‍ॅड. पानसरे यांच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित समीर गायकवाड याचा दोनवेळा जामीन अर्ज न्यायाधीशांनी फेटाळला आहे, तर सुमारे एक वर्ष एक महिना कळंबा कारागृहात राहिलेल्या समीरने अ‍ॅड. समीर पटवर्धन यांच्यावतीने गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी पुन्हा अर्ज दाखल केला. (प्रतिनिधी) सरकारी वकिलांना बोलाविलेखटल्यातील सरकारी पक्षाचे वकील अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांच्या नियुक्तीबाबत संशयित आरोपींचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी न्यायालयात आक्षेप घेतला आहे. त्या आक्षेपाबाबत तपासी अधिकाऱ्यांनी गुरुवारी न्यायालयात म्हणणे मांडण्यात येणार होते; पण राणे यांच्यासह वरिष्ठ तपास अधिकारी सुनावणीवेळी अनुपस्थित राहिले. त्यामुळे न्यायाधीशांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांना बोलावून घेतले; पण अ‍ॅड. शुक्ल यांनी हा खटला गंभीर स्वरुपाचा व आपल्यासाठी नवीन आहे, त्यामुळे याचे कामकाज पुढील सुनावणीवेळी घ्यावे, अशी विनंती केली. आणखी किती दिवस आत ठेवणार : समीरसंशयित आरोपी समीर गायकवाड याने गुरुवारी सुनावणीवेळी जामीन मिळावा यासाठी न्यायालयात तिसऱ्यांदा अर्ज दाखल केला. तपास यंत्रणा तपासाचे नाव सांगून आणखी किती दिवस मला आत ठेवणार. माझ्यावर आरोप सिद्ध होऊ शकत नाही, दहा वर्षे आत ठेवल्यानंतर माझी निर्दोष मुक्तता झाल्यास मी कारागृहात उपभोगलेल्या शिक्षेचा उत्तरदायी कोण? असाही प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सुरू ठेवावा, मी सहकार्य करेन, पण मला जामीनही मंजूर करावा, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. समीरचा जामिनासाठी तिसऱ्यांदा अर्जसमीरला अटक : १६ सप्टेंबर २०१५ जामिनासाठी पहिला अर्ज : डिसेंबर २०१५ दुसरा : मार्च २०१६ तिसरा अर्ज : २७ एप्रिल २०१७