शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: विशाळगडावरील धर्मांधता, अतिक्रमणांबाबत संभाजीराजे आक्रमक; येत्या रविवारी बैठक घेणार

By समीर देशपांडे | Updated: July 3, 2024 18:56 IST

राज्यभरातून येणार प्रतिनिधी

कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील किल्ले विशाळगडावरील धर्मांधता आणि वाढती अतिक्रमणे याबाबत माजी खासदार संभाजीराजे आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. याबाबत आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी त्यांनी रविवार दि. ७ जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक बोलावली आहे. किल्ल्यावरील वाढती अतिक्रमणे आणि धर्मांधता याबाबत राज्यभरातील शिवभक्तांनी संभाजीराजे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत संभाजीराजेंनी दीड वर्षांपूर्वी किल्ल्याला भेट देवून तेथील परिस्थितीची पाहणी केली होती. तसेच तत्कालिन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यासोबत बैठकही घेतली होती.या बैठकीत गडावर पशूपक्षी हत्या बंदी लागू करण्याचे निश्चित झाले होते. तसेच तीन महिन्यात गडावरील अतिक्रमणे हटविली जातील, असे आश्वासनही दिले होते. मात्र यातील काहीही झाले नाही. त्यामुळेच पुढची आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रविवारी ही बैठक बोलावण्यात आली आहे.याच प्रकरणात त्यावेळी स्थानिक आमदार विनय कोरे यांनीही लक्ष घातले होते. त्यामुळे संभाजीराजे रविवारच्या बैठकीत काय निर्णय जाहीर करणार याकडे शिवभक्तांच लक्ष लागून राहिले आहे.

स्थानिक राजकारणाचा संदर्भसंभाजीराजे यांच्या कार्यालयाकडून प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकामध्ये स्थानिक राजकारण्यांनी आणलेल्या अडथळ्यामुळे त्यावेळी कारवाई झाली नसल्याचा आरोप केला आहे. जिल्हा प्रशासनाची अकार्यक्षमताही याला कारणीभूत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगडSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती