शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

कोल्हापूर जिल्ह्यात संभाजी महाराज जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:56 IST

कागल : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती कागल शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त सायंकाळी छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती पालखीत ठेवून पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ आणि पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी काही काळ एकत्रित ही ...

कागल : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती कागल शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त सायंकाळी छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती पालखीत ठेवून पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ आणि पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी काही काळ एकत्रित ही पालखी वाहिली. या जयंती सोहळ्यात शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.येथील खर्डेकर चौकात ज्येष्ठ नागरिक पांडुरंग पोटे यांच्या हस्ते सकाळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तर चौकात उभारण्यात आलेल्या सकल मराठा समाजाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.यावेळी नवीद मुश्रीफ, नगराध्यक्षा माणिक माळी, भय्या माने, नितीन दिंडे, राजेंद्र जाधव, विशाल पाटील-मळगेकर, दीपक मगर, उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, राहुल घोरपडे, किरण मुळीक, एस. डी. पाटील, शंतनू शिंदे, आशाकाकी जगदाळे, रेवती बरकाळे, आदींसह मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.सायंकाळी बसस्थानक चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीत लेझीम पथक, वारकरी पथक, आदींचा सहभाग होता. शहराच्या मुख्य मार्गावरून ही मिरवणूक नेण्यात आली.अर्जुनवाडमध्ये पुतळा पूजनअर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथे छत्रपती संभाजीराजे यांची जयंती साजरी करण्यात आली. संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सुनील चौगुले, नंदकुमार पाटील, संदेश महाडिक, मारुती ढवळे, अनुप पाटील, संतोष ठाकूर, संभाजी कळंत्रे, विलास पाटील, उदय मेडसिंगे, प्रदीप चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.हलकर्णीत जयंती उत्साहातहलकर्णी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. किल्ले सामानगडावरून आणलेल्या ज्योतीचे पूजन सामाजिक कार्यकर्ते गंगाधर व्हसकोटी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवाजी लोखंडे, रामचंद्र हसबे, बाळू गोकावी, श्रीकांत कागीनकर, सुनील भोसले, आप्पासाहेब पोवार, आनंदा राऊत, श्रीकांत सावंत यांच्यासह शिवशंभू प्रतिष्ठान मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.कोतोलीत विविध कार्यक्रमकोतोली : कोतोली परिसरात छत्रपती संभाजी राजे जयंती विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी संयुक्त कोतोली यांच्या वतीने छत्रपती संभाजी राजे जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम, समाजप्रबोधन रॅली काढण्यात आली. यावेळी उपसरपंच राजेंद्र लव्हटे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तरुण मंडळांचे कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाटील, कृषी अधिकारी भाऊसो तुरंबेकर, बाजीराव लव्हटे, अशोक लव्हटे, राज गंधवाले, सागर वरपे, आदींसह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.हातकणंगलेत विविध उपक्रमहातकणंगले : हातकणंगले येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच रोहणी खोत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने, संजय चौगुले, छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील, उपसरपंच चंद्रकांत जाधव, माजी सरपंच नूरमहंमद मुजावर, संदीप कांबळे, मिथुन जाधव, सूरज सूर्यवंशी, अजित मोरे, मयूर चौगुले, मिलिंद चौगुले, सुरेश जाधव, सागर शिंदे, रतन धनगर, सचिन जाधव, यांच्यासह अन्य मान्यवर उपास्थित होते.म्हाकवेत जयंती उत्साहातम्हाकवे : म्हाकवे (ता. कागल) येथे स्वराज्यवीर संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील तरुण मंडळांच्यावतीने पन्हाळा गडावरून आणलेल्या ज्योतीचे पूजन करण्यात आले. तसेच ज्योतीची व संभाजी महाराजांच्या प्रतिमेची गावातील मुख्य मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. संभाजी महाराजांच्या जन्म पाळणा गायनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीधर्मवीर संभाजी महाराजांच्याप्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यातआली.