शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

समरजित यांनी फुंकले विधानसभेचे रणशिंग : कागल , विक्रमसिंहराजेंचा राजकीय वारसा चालविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:15 IST

कोल्हापूर/कागल : कागल तालुक्यात खालच्या दर्जाचे राजकारण सुरू असून, त्याला छेद देत समरजितसिंहराजे विकासाचे राजकारण करत आहेत.

ठळक मुद्देघाणेरड्या राजकारणाला कागलकर वैतागले : चंद्रकांतदादाज्यांनी स्वार्थासाठी स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे व सदाशिवराव मंडलिक यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना आशीर्वादाचा अर्थ काय कळणार.टीकाकारांची नावे घेऊन त्यांना कशाला मोठे करता, त्यांची पात्रता तरी काय? खासदार संभाजीराजे

कोल्हापूर/कागल : कागल तालुक्यात खालच्या दर्जाचे राजकारण सुरू असून, त्याला छेद देत समरजितसिंहराजे विकासाचे राजकारण करत आहेत. राजे विक्रमसिंह घाटगे यांचा राजकीय वारसा चालविण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांनी पुढे यावे, कागलची जनता तुम्हाला साथ देईलच, पण मुख्यमंत्री म्हणून तुमच्या मागे खंबीर उभा राहू, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राजे विक्रमसिंह घाटगे व सदाशिवराव मंडलिक यांच्या पाठीत खंजीर खुपसणारी वृत्ती एका बाजूला आहे आणि दुसºया बाजूला शाहूंच्या संस्काराचे कर्तृत्व आहे, यातील कोणाबरोबर राहायचे हे जनतेने ठरवावे, असे आवाहन करत समरजितसिंह घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

कागल येथे शनिवारी झालेल्या शेतकरी मेळाव्यात समरजितसिंह घाटगे यांनी केलेले शक्तिप्रदर्शन व विरोधकांवर चौफेर हल्ला चढवत आपला २०१९चा इरादा स्पष्ट केला. घाटगे म्हणाले, गेल्या वर्षात कागलमध्ये स्वत:ला मोठे करण्यासाठी पुढे येणाºयाला कापले जाते, पण आमच्यावर ‘शाहूंचे संस्कार आहेत. आम्ही कर्तृृत्वाने पुढे जाणार आहे. माझ्यावरील टीका एकवेळ खपवून घेऊ पण मुख्यमंत्र्यांवरील टीका यापुढे खपवून घेणार नाही. मुख्यमंत्री दुसºयांदा कागलला आल्याने त्यांचा आशीर्वाद लाभतो का? अशी टीका केली जाते, पण आम्हाला थोरांचे आशीर्वाद घेण्याची सवय आहे. ज्यांनी स्वार्थासाठी स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे व सदाशिवराव मंडलिक यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना आशीर्वादाचा अर्थ काय कळणार.टीका करणे हे शाहू घराण्याची शिकवण नसल्याचे सांगत खासदार संभाजीराजे म्हणाले, टीकाकारांची नावे घेऊन त्यांना कशाला मोठे करता, त्यांची पात्रता तरी काय? ‘शाहूं’चा विचार घेऊन सकारात्मक राजकारण करा. कागलच्या राजकारणाचा खरपूस समाचार घेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, समरजितराजेंनी विकासाच्या राजकारणातून सामान्य माणसाला आपलेसे केल्याने विरोधक भांबावून गेले आहेत. आतापर्यंत या मंडळींनी गावागावांत विष पेरले, भावाभावांत भांडणे लावून स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांची डोकी फोडली. सकारात्मक व विकासाचे राजकारण करण्याची गरज असली तरी या मंडळींची दुकानदारी बंद होईल. पायाखालची वाळू सरकू लागल्यानेच बेछूट आरोप करीत आहेत.कायद्याचा बडगा दाखवाचकागल नगरपालिकेची इमारत आगीने जळली आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे जळालेली इमारत शोभत नाही. यासाठी आपण दुरुस्तीसाठी निधी द्यावा, अशी मागणी करतो पण, इमारतीला आग लागली की लावली? याची शहानिशा व्हायला हवी. त्याची चौकशी करून एकदा कायद्याचा बडगा दाखवाच, असे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.‘के.पीं’च्या उपस्थितीने भुवया उंचावल्याराष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते व ‘बिद्री’चे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी कागल येथील सभेला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री व समरजितसिंह यांनी त्यांच्यासमोरच हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठवली.‘शाहूं’च्या कार्यक्षेत्रात गडहिंग्लजचंदगड मतदारसंघापासून आपल्याला तोडल्याची गडहिंग्लजकरांची भावना आहे. त्यांना पोरके वाटत असले तरी ‘शाहू’ ग्रुप त्यांना आपलेसे करणार असून, गडहिंग्लज तालुक्यातील ४१ गावांना ‘शाहू’च्या कार्यक्षेत्रात घेत असल्याचे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.मंडलिकांवर टीका संभाजीराजे व समरजितसिंह घाटगे हे भाजपचे लाभार्थी असल्याची टीका संजय मंडलिक यांनी केली होती. त्यावर समरजितसिंह म्हणाले, ज्यांच्याकडे कर्तृत्वच नाही त्यांना कर्तृत्व व लाभातील फरक काय कळणार? ज्यांचा मोबाईल कायम बंद असतो, त्यांची आमच्यावर टीका करण्याची पात्रता काय? त्याची दखल घेण्याची गरज नसल्याची खिल्ली संभाजीराजे यांनी उडवली.महिला, तरुणांची उपस्थिती लक्षणीयगहिनीनाथ गैबी पीर नगरातील पटांगणावर कागल, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा जनसागर उसळला होता. मेळाव्याला तरुण व महिलांची संख्या लक्षणीय होती. तरुणांमध्ये कमालीचा उत्साह जाणवत होता. सभेनंतर जथ्थेच्या जथ्थे बाहेर पडल्याने कागल शहरातील रस्ते तासभर तुंबले होते.समरजितसिंहराजेंच्या घोषणा....कागल व गडहिंग्लजमध्ये बॅँकेच्या दहा नवीन शाखामुद्रालोनच्या धर्तीवर बॅँकेच्या वतीने युवकांना ‘शाहू’ कर्ज योजनागडहिंग्लजमधील ४१ गावे ‘शाहंू’च्या कार्यक्षेत्रातजिजाऊ संघटनेच्या वतीने महिलांना कॅन्सर प्रबोधन व उपचारशंभर एकरांवर सोलर, नैसर्गिक व सेंद्रिय शेती.