शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत भाजीपाल्याची विक्री मातीमोल दराने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 14:29 IST

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची विक्री मातीमोल दराने होत आहे. कोबी १, वांगी ५, टोमॅटो २ तर ढब्बू १० रुपये किलोने विक्री होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देबाजार समितीत भाजीपाल्याची विक्री मातीमोल दरानेकोबी १, वांगी ५, टोमॅटो २ तर ढब्बू १० रुपये किलो : शेतकरी हवालदिल

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची विक्री मातीमोल दराने होत आहे. कोबी १, वांगी ५, टोमॅटो २ तर ढब्बू १० रुपये किलोने विक्री होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.अतिवृष्टी, महापुरात संपूर्ण पिके उद्ध्वस्त झाली; त्यातून सावरत पुन्हा लागवड केलेल्या भाजीपाल्याला चांगला दर मिळेल असे अपेक्षित होते. साधारणत: आपल्याकडे आॅक्टोबरपासून स्थानिक भाजीपाला बाजारात येतो आणि दर उतरतात. मात्र, यंदा परतीच्या पावसाने भाजीपाला उशिरा आला.

डिसेंबर, जानेवारीपर्यंत भाजीपाल्याचे दर खाली येतात, मात्र फेबु्रवारीनंतर ते वाढू लागतात. उन्हाचा तडाका जसा वाढत जातो, तसे उत्पादन कमी मिळते. मागणी आणि पुरवठा यात तफावत राहते, परिणामी, दर वाढू लागतात मात्र, यंदा काहीशी परिस्थिती उलटी दिसते. फेबु्रवारी संपत आला तरी भाजीपाल्याच्या दरातील घसरण काही थांबत नाही.

मंगळवारी तर भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली. कोबीची २७८ पोत्यांची आवक झाली, यामध्ये किमान १ ते कमाल दर ५ रुपये किलो झाला. वांग्याच्या दरातही मोठी घसरण झाली असून, घाऊक बाजारात ५ पासून १५ रुपयांपर्यंत दर राहिला आहे.

शेतकऱ्यांना टोमॅटो बाजारापर्यंत आणायचा सोडाच, पण त्याच्या काढणीचे पैसेही अंगावर बसत आहेत. एरव्ही बारमाही तेजीत असणाऱ्या ढब्बूने शेतकऱ्यांना घाम फोडला असून, १० रुपये किलोने विक्री करावी लागत आहे. तीच अवस्था गवारी, कारली, भेंडी, दोडक्याची आहे.कोल्हापूर बाजार समितीमध्ये येणारा निम्मा माल रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जातो. मात्र, आता निपाणीतील दहा-बारा शेतकरी एकत्रित येऊन थेट कोकणात माल पाठवत असल्याने येथील मालाला उठाव नाही, हेही दर घसरण्यामागे कारण सांगितले जाते. दरातील घसरण आणि कमिशनबाबत भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष जमीर बागवान यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.कर्नाटकातील आवकेचाही परिणामकर्नाटकातून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. विशेषत: घटप्रभा येथून जिल्ह्यातील मोठमोठ्या बाजारात भाजीपाला विक्रीसाठी येत असल्याने दरावर परिणाम होत असल्याचे किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

कोबीच्या गड्ड्यापेक्षा रोपाला दुप्पट दररोपवाटिकेतून कोबीचे रोप घेतले तर त्यासाठी दोन रुपये लागतात. त्याचा महिना-दीड महिना सांभाळ करून त्यापासून बनवलेला कोबीचा गड्डा मात्र एक रुपयाला विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.कमिशन वसुलीतूनही लूटकायद्याप्रमाणे खरेदीदारांकडून ६ टक्के प्रमाणे कमिशन घ्यायचे असते. मात्र, भाजीपाला मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडूनच वसूल केले जातात. तक्रार येणार म्हणून त्याच्या पट्टीत न लावता, पैसे देताना तेवढे कमी करूनच दिले जाते, याबद्दल शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

व्यापारी जाणीवपूर्वक दर पाडत असून, नफा राहूदे खर्चच अंगावर येत आहे. त्यात ६ टक्केप्रमाणे कमिशन आमच्यातून घेऊन पिळवणूक सुरू आहे. याबाबत तक्रार करायची तर समिती पुरावे मागते.-महादेव वाघमोडे, शेतकरी, अंंबप

स्थानिक भाजीपाला आल्याने दरात घसरण झाली, ही वस्तुस्थिती आहे. कमिशनबाबत तक्रारी असतील तर शेतकऱ्यांनी समितीकडे यावे, संबंधित व्यापाºयांवर कारवाई केली जाईल.-गजानन पाटील, विभागप्रमुख, भाजीपाला 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर