शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘ब्याडगी’च्या नावाखाली ‘सिजन्टा’ची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:17 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ब्याडगी मिरचीच्या नावाखाली ‘सिजन्टा’ मिरचीची राजरोस विक्री सुरू आहे. ‘ सिजन्टा ’ दिसायला ‘ब्याडगी’सारखी असल्याने ग्राहकांची फसवणूक होत असून, मिरची विक्रेत्यांकडून ब्याडगीच्या दरातच विक्री सुरू आहे. ग्राहकांच्या आता लक्षात येणार नाही, पण पावसाळ्यात ‘सिजन्टा’ मिरचीची चटणी पिवळसर पडण्यास सुरुवात होईल आणि खरे रूप समोर ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ब्याडगी मिरचीच्या नावाखाली ‘सिजन्टा’ मिरचीची राजरोस विक्री सुरू आहे. ‘सिजन्टा’ दिसायला ‘ब्याडगी’सारखी असल्याने ग्राहकांची फसवणूक होत असून, मिरची विक्रेत्यांकडून ब्याडगीच्या दरातच विक्री सुरू आहे. ग्राहकांच्या आता लक्षात येणार नाही, पण पावसाळ्यात ‘सिजन्टा’ मिरचीची चटणी पिवळसर पडण्यास सुरुवात होईल आणि खरे रूप समोर येणार आहे.पावसाळ्याची बेगमी करण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून लाल मिरचीचा हंगाम जोरात सुरू आहे. कोल्हापुरात साधारणत: आंध्रप्रदेश व कर्नाटकातून मिरचीची आवक होते. यंदा मिरचीचे पीक कमी झाल्याने आवक मंदावली आहे. हंगामाच्या सुरुवातीपासून मिरची मागणीप्रमाणे येत नसल्याने दर थोडे चढेच राहिले आहेत. किलोमागे चाळीस ते पन्नास रुपयांनी दरात वाढ झाली आहे.साधारणत: कोल्हापूर जिल्ह्यात लाल व तिखट चटणी खाण्याची सवय आहे. ही चटणी तिखट पण तेवढीच रूचकर लागत असल्याने ‘ब्याडगी’ अधिक लाल तिखट मिरची एकत्रित करून चटणी केली जाते. त्यामुळेच ‘ब्याडगी’ संकेश्वरी मिरचीला अधिक पसंती आहे; पण दोन वर्षांपासून मिरचीमध्ये भेसळ सुरू झाली आहे. गेल्यावर्षी आंध्रप्रदेशमधून ‘लाली’ मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. व्यापाऱ्यांनी त्याची विक्री ‘ब्याडगी’च्या दरानेच केली होती.यंदा ‘लाली’ आणि ‘ब्याडगी’चे क्रॉस करून ‘सिजन्टा’ मिरची बाजारात आली आहे. ‘सिजन्टा’ दिसायला ‘ब्याडगी’सारखीच दिसते; पण या मिरचीचा खरा दर १२० रुपये प्रतिकिलोच्या आसपास आहे. त्याची विक्री ‘ब्याडगी’च्या नावाखाली करून १८० ते २०० रुपये किलोने सुरू आहे. ‘ब्याडगी’ आणि ‘सिजन्टा’ या मिरचीतील फरक घाऊक व्यापाºयांनाच माहिती आहे. त्यामुळे किरकोळ व्यापाºयांनाही चकवा बसला असून तेही याबाबत अनभिज्ञ आहेत. तेही ‘ब्याडगी’म्हणूनच ‘सिजन्टा’ची विक्री करत आहेत. चटणी केल्यानंतर त्याचा फरक दिसणार नाही, पावसाळ्यात ती पिवळी पडण्यास सुरुवात होणार आहे.‘सिजन्टा’ कशी ओळखायचीब्याडगी मिरचीचा शेंडा आपण खाल्ला तर तोंड भाजते; पण ‘सिजन्टा’ मिरचीचा शेंडा गोड लागतो आणि नंतर आंबट वाटतो. ग्राहकांनी चवीतून खरी ‘ब्याडगी’ ओळखली पाहिजे.