शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नऊ अधिकाऱ्यांसह ३१ जणांना शिवाजी विद्यापीठाच्या स्वनिधीतून वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 11:48 IST

राज्य शासनाने वेतन अमान्य केलेल्या नऊ अधिकाऱ्यांसह ३१ जणांना शिवाजी विद्यापीठाच्या फंडातून (निधी) वेतन दिले जात आहे. त्यांना १४ महिन्यांचे वेतन म्हणून वीस कोटी रुपये विद्यापीठ प्रशासनाने अदा केल्याची माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

ठळक मुद्देनऊ अधिकाऱ्यांसह ३१ जणांना शिवाजी विद्यापीठाच्या स्वनिधीतून वेतनमाहिती अधिकारातून उघड; शासनाकडून वेतन अमान्य

कोल्हापूर : राज्य शासनाने वेतन अमान्य केलेल्या नऊ अधिकाऱ्यांसह ३१ जणांना शिवाजी विद्यापीठाच्या फंडातून (निधी) वेतन दिले जात आहे. त्यांना १४ महिन्यांचे वेतन म्हणून वीस कोटी रुपये विद्यापीठ प्रशासनाने अदा केल्याची माहिती अधिकारातून उघड झाले आहे.उपकुलसचिव पदावरील व्यक्तीला परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालकपदाचा कार्यभार देता येत नसल्याचा शासनाचा आदेश दाखवूनसुद्धा प्रशासनाने गजानन पळसे यांना पदभार दिला आहे. त्यांच्या वेतनाची माहिती संयुक्त विद्यार्थी मंचचे निमंत्रक शुभम शिरहट्टी यांनी माहिती अधिकारातून मागविली. त्यामध्ये पळसे यांच्यासह ३१ कर्मचाऱ्यांचे वेतन आॅगस्ट २०१८ रोजी शासनाने अमान्य केल्याची माहिती मिळाली.

शासनाने मंजूर केलेल्या पदांना अनुदान असल्याने वेतन मान्य-अमान्य ठरविलेल्या नऊ अधिकाऱ्यांसह ३१ जणांचे २० कोटी रुपयांचे वेतन विद्यापीठ फंडातून देण्यात आले आहे. या ३१ जणांमध्ये उपकुलसचिव,सहाय्यक कुलसचिव, पर्यवेक्षक, लिपिक आदी पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

अशाप्रकारे विद्यापीठ फंडातून पैसे का दिले, याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी मंचच्यावतीने निमंत्रक शिरहट्टी यांनी सोमवारी केली. याबाबत मंचच्या शिष्टमंडळाने याबाबत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांची भेट घेतली.

चर्चा करणारया मंचने केलेल्या मागणीची माहिती कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांना देण्यात येईल. त्यांच्यासह मंचच्या शिष्टमंडळासमवेत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, असे कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी सांगितले.

वारेमाप उधळपट्टी थांबवाविद्यापीठातील विद्यार्थ्यांचा पैसा शैक्षणिक अर्हता, पात्रता नसलेल्या लोकांवर खर्च करून होत असलेली वारेमाप उधळपट्टी थांबवावी. संबंधित ३१ लोकांबाबत लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करावी. अनधिकृतपणे पदभार दिलेल्या पळसे यांची प्रभारी संचालकपदावरून मुक्तता करावी. योग्यप्रकारे आणि विद्यार्थी हिताच्यादृष्टीने फंडाच्या खर्चाची तरतूद व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या मंचच्यावतीने शिरहट्टी यांनी दिला आहे. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर