शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

साई चषक ‘महाराष्ट्र’ कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:22 IST

मेजर ध्यानचंद हाॅकी स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात ‘महाराष्ट्र’कडून राजगुरू जगदाळे व पृथ्वीराज कदम यांनी गोल केले. राजर्षी ...

मेजर ध्यानचंद हाॅकी स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात ‘महाराष्ट्र’कडून राजगुरू जगदाळे व पृथ्वीराज कदम यांनी गोल केले. राजर्षी छत्रपती शाहूकडून ऋतुराज कदम याने एकमेव गोल केला. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यांत दोन्ही संघांकडून आक्रमक व वेगवान खेळाचे प्रदर्शन झाले. तत्पूर्वी सकाळी झालेल्या उपांत्य फेरीत ‘महाराष्ट्र’ने देवगिरी फायटर्स संघाचा ५-० असा एकतर्फी पराभव केला होता. त्यात पृथ्वीराज खोत, तन्मय जाधव, प्रणव चौगुले, अनिरुद्ध पाटील, पृथ्वीराज कदम यांनी गोल केले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात राजर्षी छत्रपती शाहू स्पोर्टस्‌ने तुल्यबळ छावा मित्र मंडळचा २-० असा पराभव केला. त्यात ‘शाहू’कडून ऋतुराज कदम, आयूष चौगुले यांनी गोल केले.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ अमित शिंदे, संजीवकुमार, विजय साळोखे (सरदार), सुदाम तोरस्कर, अविनाश गवळी, राजू गवळी, समीर जाधव, मिलिंद शेलार, सागर जाधव, नजीर मुल्ला, ओंकार भांडवले यांच्या उपस्थितीत झाला. स्पर्धेतील विजेत्या संघास श्रीपतराव शिंदे यांच्या स्मरणार्थ चषक व रोख तीन हजार रुपये देण्यात आले., तर उपविजेत्या संघास दोन हजार व चषक देण्यात आला.

स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू असे,

उत्कृष्ट गोलरक्षक - स्वप्निल कुराडे (राजर्षी शाहू स्पोर्टस्‌), उत्कृष्ट बचावपटू - प्रणव सूर्यवंशी (सरदार स्पोर्टस्‌), आघाडीवीर- तन्मय जाधव , हाफ - प्रणव चौगुले (दोघेही महाराष्ट्र क्रीडा मंडळ), (महाराष्ट्र क्रीडा मंडळ), सामनावीर - पारस पाटील (राजर्षी शाहू), प्रज्ज्वल पाटील, शाहू चौगुले, विवेक दुर्गुळे, विनायक हांडे, (उदयोन्मुख खेळाडू)

फोटो : २१०३२०२१-कोल-हाॅकी

आेळी : मेजर ध्यानचंद हाॅकी स्टेडियममध्ये जिल्हा हाॅकी असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या साई चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणाऱ्या महाराष्ट्र क्रीडा मंडळास अमित शिंदे यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला.