चंद्रकांत कित्तुरकोल्हापूर : देशातील ५०२ साखर कारखान्यांचा साखरेचा बफर स्टॉक केंद्र सरकारने जाहीर केला आहे. यामध्ये देशात सातारा जिल्ह्यातील सह्याद्री साखर कारखाना पहिला, तर कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर साखर कारखाना दुसऱ्या स्थानावर आहे.देशात यंदा साखरेचे ३१५ लाख टनांहून अधिक उत्पादन झाले आहे, तर मागणी २५० लाख टन आहे. अतिरिक्त उत्पादन झाल्याने घाऊक बाजारातील साखरेचे दर २४ रुपयांपर्यंत खाली आले होते. ते वाढावेत यासाठी केंद्र सरकारने कारखान्यांसाठी साखरेचा विक्री दर ठरविण्यासह विविध उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये ३० लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याच्या निर्णयाचाही समावेश होता.या निर्णयाची अंमलबजावणी करताना देशातील ५०२ साखर कारखान्यांकडील ३१ मे अखेर शिल्लक असलेला साखर साठा विचारात घेऊन साखरेचा बफर स्टॉक राहील याची यादी जाहीर केली आहे.व्याज, विमा, भाडे मिळणारबफर स्टॉक करणाºया साखर कारखान्यांना केंद्र सरकार व्याज, विमा आणि गोदाम भाडे देणार आहे. त्यासाठी ११०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा स्टॉक एक वर्षासाठी असणार आहे.साखरेचे दर वधारणार : केंद्र सरकारने ६००० कोटींचे पॅकेज जाहीर केल्यानंतर घाऊक बाजारातील साखरेचे दर ३२०० रुपये प्रतिक्विंटलवर गेले होते. सध्या ते २९५० ते ३००० रुपयांवर आहेत. साखरेच्या बफर स्टॉकमुळे हे दर वधारतील, असा साखर उद्योगातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.महाराष्टÑात जादा साखर साठा : गेल्या दोन-तीन वर्षापासून उत्तर प्रदेश साखर उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. मात्र बफर स्टॉकची यादी पहाता तेथील कारखान्यांपेक्षा महाराष्टÑातील कारखान्याकडे जादा साखर शिल्लक असल्याचे दिसते. यावरुन उत्तर प्रदेशातील कारखान्यांनी त्यांच्याकडील साखर मोठ्या प्रमाणात विकून टाकल्याचे स्पष्ट होते.
साखरेच्या बफर स्टॉकमध्ये सह्याद्री कारखाना देशात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 04:49 IST