शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

सदाभाऊंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट---ऊसदर प्रश्नी श्रेयवादाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:53 IST

कोल्हापूर : या गळीत हंगामात उसाला पहिली उचल म्हणून ‘एफआरपी’पेक्षा ३०० रुपये जादा मिळावेत, अशी मागणी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देपहिला हप्ता ठरविण्याची घाई

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/कोल्हापूर : या गळीत हंगामात उसाला पहिली उचल म्हणून ‘एफआरपी’पेक्षा ३०० रुपये जादा मिळावेत, अशी मागणी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.स्वाभिमानी संघटनेपासून फारकत घेतल्यानंतर दसºयाच्या मुहूर्तावर खोत यांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना केली. संघटनेच्या इचलकरंजीत झालेल्या स्थापनेच्या मेळाव्यात त्यांनी उसाच्या पहिल्या उचलीची हीच मागणी केली होती.

यंदा पहिली उचल मीच ठरवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जयसिंगपूरची ऊस परिषद २८ आॅक्टोबरला आहे. यंदाचा हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे; परंतु तोपर्यंत पहिल्या हप्त्याचा विषय चर्चेत ठेवायचा, सदाभाऊंनी मागणी करायची, तिला मुख्यमंत्र्यांनी संमती द्यायची व ‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदेतील व आंदोलनातीलही हवा काढून घ्यायची, अशी ही भाजपपुरस्कृत रणनीती आहे. त्याचाच भाग म्हणून खोत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यंदा बाजारात साखरेचा दर चांगला आहे. कोल्हापूर-सांगली-सातारा पट्ट्यात उसाचा उतारा चांगला असतो. त्यामुळे ‘एफआरपी’पेक्षा सरासरी ३०० रुपये जास्त देण्यात यंदा कारखानदारांचीही खळखळ असणार नाही. परिणामी जे गणित सहजच सुटणार आहे, ते आपण घालून त्याचे श्रेय घेण्याचा सदाभाऊंचा प्रयत्न आहे.

राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे आॅनलाईन करण्यात यावेत. याशिवाय साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल ४००० रुपये असावा, मराठा आरक्षण संदर्भात तत्काळ मागासवर्गीय आयोगाची नियुक्ती करावी, साखरेचे दर हे उद्योगधंद्यांसाठी आणि घरगुती उपयोगाकरिता वेगवेगळे आकारावेत, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासवर्गीय महामंडळावर अध्यक्षांची नेमणूक करण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन रयत क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाने खोत यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना दिले. या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील, दीपक भोसले, सागर खोत, पांडुरंग शिंदे, आदी उपस्थित होते.