शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांच्या कुटुंबीयांचा त्याग अनमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 01:06 IST

सेनापती कापशी : शहीद जवान साताप्पा पाटील यांच्या कुटुंबीयांनी शासनाकडून मिळालेली मदत शाळेच्या इमारतीला दिली आहे. मुलांना चांगले शिक्षण ...

सेनापती कापशी : शहीद जवान साताप्पा पाटील यांच्या कुटुंबीयांनी शासनाकडून मिळालेली मदत शाळेच्या इमारतीला दिली आहे. मुलांना चांगले शिक्षण मिळावे याकरिता वीरपत्नी अश्विनी पाटीलसह पाटील कुटुंबीय व ग्रामस्थांनी केलेल्या मदतीतून ही सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. शहीद जवानाच्या कुटुंबीयांनी केलेला त्याग अनमोल असल्याचे प्रतिपादन शाहू छत्रपती यांनी केले. बेलेवाडी मासा (ता. कागल) येथे जयशिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शहीद जवान साताप्पा महादेव पाटील विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योगपती व्ही. बी. पाटील होते.यावेळी संजय मंडलिक म्हणाले, स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या हस्ते या इमारतीचा पायाभरणी समारंभ झाला होता. त्यांच्या हस्तेच या इमारतीचे उद्घाटन व्हावे अशी लोकभावना होती; पण आज मंडलिक नाहीत, पण आम्ही ज्यांना वडीलस्थानी मानतो असे शाहू छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. मंडलिकांनी ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, या करता दुर्गम भागात शाळा सुरू केल्या. साताप्पा पाटील हे सीमेवर रक्षण करत असताना शहीद झाल्यानंतर क्षणात माजी खासदार मंडलिक यांनी साताप्पा पाटील यांचे नाव शाळेला दिले. वीरपत्नी अश्विनी पाटील, वीरमाता आनंदी पाटील, वीरपिता महादेव पाटील यांनी केलेल्या त्यागातून व ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याने याठिकाणी शाळेची सुसज्ज इमारत उभी राहिली.व्ही. बी. पाटील, कर्नल आर. के. तिम्मापूर, शिक्षण सभापती अंबरीश घाटगे, वीरपत्नी अश्विनी पाटील, संदीप राजगोळकर, श्रीपतराव शिंत्रे, सदाशिव आंबोशे, आदींनी मनोगत व्यक्त केले. आभार वीरेंद्र मंडलिक यांनी मानले. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक पी. डी. पाटील यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष राजेखान जमादार, वीरपिता महादेव पाटील, वीरमाता आनंदी पाटील, प्रदीप चव्हाण, दत्तात्रय चौगले, विश्वास कुराडे, शशिकांत खोत, सुभेदार मेजर माणिक थोरात, प्रकाश नारायण पाटील, जे. डी. मुसळे, धनाजी काटे, मुकुंद बोडके, आदी उपस्थित होते.