शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कुंडलच्या मैदानात ‘साबा’ विजेता

By admin | Updated: October 5, 2015 01:02 IST

पाच लाखांचे इनाम पटकाविले : हनुमान आखाड्याचा ‘नवीन’ दुहेरी पटावर चितपट

धनाजी आवटे -- कुंडलगणेशोत्सवानिमित्त कुंडल (ता. पलूस) येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र कुस्ती’ मैदानात पंजाबच्या प्रीतमसिंग आखाड्याचा मल्ल, हिंदकेसरी व भारत केसरी साबाने दिल्लीच्या हनुमान आखाड्याचा मल्ल, हिंदकेसरी, भारत केसरी व रुस्तुम ए हिंद पैलवान नवीन मोरला ८ व्या मिनिटाला दुहेरी पटावर चितपट केले व कुस्तीशौकिनांची वाहवा मिळवली. त्याने क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखाना व अरुण लाड यांच्यावतीने प्रथम क्रमांकाचे रोख पाच लाखांचे बक्षीस व चषक मिळविला.सायंकाळी ६ वाजता साबा विरुद्ध नवीन मोर यांच्यातील प्रथम क्रमांकाच्या कुस्तीस सुरुवात झाली. प्रथम दोघांनी एकमेकांची ताकद अजमावल्यानंतर दोघेही आक्रमक झाले. दोघांची सतत खडाखडी होत होती. साबा सतत आक्रमक पवित्रा घेत होता. अखेर ८ व्या मिनिटाला साबाने नवीन मोर याला दुहेरी पटावर चितपट केले.द्वितीय क्रमांकाची कुस्ती हरियाणाचा हिंदकेसरी व भारतकेसरी कृष्णकुमार व हरियाणाचाच हिंदकेसरी हितेश यांच्यात लावण्यात आली. रटाळ होत चालल्याने ही कुस्ती गुणांवर लावण्यात आली. कृष्णकुमारने आक्रमक पवित्रा घेत हितेशवर गुणांत आघाडी घेतली. अखेर कृष्णकुमार गुणांवर विजयी झाला. ४ लाख रुपये बक्षीसाची ही कुस्ती महेंद्रआप्पा लाड मित्रमंडळातर्फे लावण्यात आली होती. तृतीय क्रमांकाची कुस्ती हिंदकेसरी सुनील साळुंखे व पंजाब केसरी काका परमितसिंग यांच्यात लावण्यात आली. प्रथम दोघांच्यात खडाजंगीनंतर सुनील साळुंखेने काकावर बगलडू डावावर कब्जा घेतला. काकाने या कब्जातून निसटण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुनील साळुंखेने आक्रमक पवित्रा घेत समोरून झोळी डावावर पैलवान काकाला चितपट केले व दोन लाख रुपये बक्षीस पटकावले.चतुर्थ क्रमांकाची कुस्ती हरियाणाचा ज्युनिअर परमिंदर व आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचा कामगार केसरी कौतुक डाफळे यांच्यात लावण्यात आली. प्रथम कौतुक डाफळेने परमिंदरवर घुटना डावाचा प्रयत्न केला. त्यात परमिंदर निसटण्यात यशस्वी झाला. दोघेही सतत आक्रमक पवित्रा घेत होते. कुस्ती सतत रटाळ होत होती. शेवटी ही कुस्ती गुणांवर लावण्यात आली. या कुस्तीत कौतुक डाफळे गुणांवर विजयी झाला व त्याने किर्लोस्कर कंपनीच्यावतीने लावलेले २ लाख रुपयांचे बक्षीस पटकावले. पाचव्या क्रमांकाची कुस्ती दिल्लीचा अमितकुमार व आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचा किरण भगत यांच्यात दीड लाख रुपये बक्षिसासाठी लावण्यात आली. किरण भगतने आक्रमक पवित्रा घेत नवव्या मिनिटाला कोपराचा घुटना डावावर अमितकुमारला चितपट केले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कॅप्टन रामचंद्र लाड यांच्यावतीने लावण्यात आली.या मैदानात कुबेर पुजारी, निनाद बडरे, राहुल माने, तानाजी एडके, करेआप्पा, अक्षय खारगे, महेश मदने, रणजित खांडेकर, नीलेश पवार, प्रणव आवटे आदी मल्लांनी चटकदार कुस्त्या केल्या. तसेच अविनाश पाटील विरुद्ध प्रवीण थोरात व सुशांत जाधव विरुद्ध सुहास गोडगे यांच्या कुस्त्या बरोबरीत सोडविण्यात आल्या. तसेच महिला मल्ल काजल जाधव हिनेही कुस्ती केली. प्रारंभी क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले. (वार्ताहर)क्षणचित्रेयेथे दुपारी १ वाजता मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे मैदान सुरुवात होण्यास विलंब झाला.महाराष्ट्र चॅम्पियन प्रकाश कोळेकर यास उत्कृष्ट मल्ल म्हणून शामराव लाड पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख पाच हजार रुपये व चषक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता पैलवान नरसिंग यादव यास आॅलम्पिक सरावासाठी अरुण लाड यांनी एक लाख रुपये दिले.रोहन सकटे याने मैदानात योगासने सादर केली.मैदानास आ. बाळासाहेब पाटील, माजी आ. पृथ्वीराज देशमुख, सदाभाऊ खोत, रावसाहेब मगर, वस्ताद प्रकाश पाटील, जितेश कदम, पोलीस उपअधीक्षक कृष्णत पिंगळे, उत्तम फडतरे, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संजय शिंदे, तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी भेट दिली.याप्रसंगी अध्यक्ष बाळासाहेब लाड, श्रीकांत लाड, सर्जेराव पवार, हैबत लाड, उदय लाड, किरण लाड, डॉ. योगेश लाड, मुकुंद जोशी आदी उपस्थित होते.