मोरे म्हणाले, संस्थेने सभासदांचे आर्थिक हित साधतानाच समाजातील चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याचा उपक्रमही राबविला आहे. भांबर यांचे प्रशासन व कार्य करण्याची पद्धत कौतुकास्पद असून या महाविद्यालयाचे नाव आदर्श करतील.
या वेळी भांबर व संचालक डॉ. अशोक बाचूळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी प्र. प्राचार्य डॉ. अशोक सादळे, संचालक डॉ. तानाजी कावळे आदी उपस्थित होते. प्रा. एस. बी. चौगुले यांनी स्वागत केले. रवींद्र हिडदुगी यांनी सूत्रसंचालन केले. मोहन शिंदे यांनी आभार मानले.
फोटो ओळी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे एस. बी. भांबर यांचा सत्कार एम. ए. मोरे यांनी केला. या वेळी अशोक सादळे, तानाजी कावळे, अशोक बाचूळकर आदी उपस्थित होते.
क्रमांक : ३००६२०२१-गड-०३