वारणानगर : जाखले हायस्कूलचे विज्ञान शिक्षक व राष्ट्रीय पारितोषिक विजेते संभाजी पांडुरंग भोसले यांचा
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पुरस्काराने गौरव करण्यात आला. शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनी डी. बी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुरस्कार प्राप्त भोसले यांनी मार्गदर्शन केलेल्या ९ विज्ञान उपकरणांची निवड राज्यस्तरावर व २ विज्ञान उपकरणांची निवड राष्ट्रीय स्तरावर झाली आहे, तर एका विज्ञान उपकरणास राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचा जहांगीर पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल त्यांचा माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते गौरवही झालेला आहे. यासाठी त्यांना संस्थेचे अध्यक्ष पी. बी. पाटील आणि सचिव दिलीप पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
फोटो ओळ - जाखले हायस्कूलचे विज्ञान शिक्षक व राष्ट्रीय पारितोषिक विजेते संभाजी पांडुरंग भोसले यांचा
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव केला. सोबत पालकमंत्री सतेज पाटील, आदी.
१७ एस.पी. भोसले शिक्षक