शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर फौजदार जाळ्यात

By admin | Updated: April 26, 2017 01:06 IST

‘लाचलुचपत’ची कारवाई; २.४० लाखांची लाच स्वीकारली

आजरा : आजरा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक जे. डी. ऊर्फ जनार्दन दगडू जाधव यांना दोन लाख चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले. या कारवाईने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, संदीप बाळासाहेब पाटील (रा. मडिलगे, ता. आजरा) यांना गावाशेजारी बीअर बार सुरू करावयाचा होता. यासाठी परवान्याबाबत त्यांनी जाधव यांची भेट घेतली. बार परवान्यासंदर्भातील अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. तुम्हाला बीअर बारचे लायसन्स् मिळवून देतो परंतु त्यासाठी अधिकाऱ्यांना २ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. पाटील यांनी बँक आॅफ महाराष्ट्रच्या चेकने दोन लाख रुपये दिले.त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने महामार्ग व राज्य मार्गावरील बीअरबार दुकान बंद करावे, असा आदेश दिल्याने पाटील यांनी जाधव यांना भेटून बीअरबार परवाना मला नको व दिलेले पैसे परत द्या, अशी मागणी केली. त्यावेळी जाधव यांनी तू दिलेल्या पैशाच्या दुप्पट खर्च झाला आहे. माझे वर खर्च झालेले आणखी अडीच लाख रुपये मला दे, असा तगादा पाटील यांच्याकडे लावला. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाटील यांनी तक्रार नोंदविली.पोलिस उपनिरीक्षक जाधव यांच्याविरुद्ध लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पंच व साक्षीदारांसमक्ष पंचायत समिती कार्यालयासमोर ४० हजार रुपये रोख व २ लाख रकमेचा चेक स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रसाद हसबनीस, पोलिस उपअधीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण पाटील, पोलिस निरीक्षक, सहा. फौजदार शाम बुचडे, मनोज खोत, मोहन सौंंदत्ती, संदीप पावलेकर या लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)पोलिस खाते हादरलेपोलिस खात्यामध्ये बेकायदेशीररीत्या पैसे कमावणे हे नवीन नसले तरी या कारवाईत तब्बल साडेचार लाख रुपये इतकी रक्कम पुढे येत असल्याने कारवाईने पोलिस दलात खळबळ माजली आहे.कारवाईची मालिका सुरूच : भूमी अभिलेख लिपिक, अभियंता, आजरा तालुक्यातील तलाठी, तहसीलदार, पोलिस उपनिरीक्षक अशा बड्या मंडळींपासून ते छोट्या-छोट्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाईची मालिका सुरूच असल्याचे मंगळवारच्या कारवाईने पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.