शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कारभारणींच्या उमेदवारीसाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:23 IST

ज्योती पाटील पाचगाव : प्रभाग क्रमांक ६५, राजेंद्रनगर हा प्रभाग यंदा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला असून या प्रभागात आपल्या ...

ज्योती पाटील

पाचगाव : प्रभाग क्रमांक ६५, राजेंद्रनगर हा प्रभाग यंदा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला असून या प्रभागात आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवून देण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे धावपळ सुरू केली आहे. सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारी देताना नेत्यांचा चांगलाच कस लागणार आहे. यातून नाराजीही उद्‌भवण्याची शक्यता असून बंडखोरांना शांत करण्याचे आव्हान नेत्यांसमोर उभे ठाकणार आहे. या प्रभागात जवळजवळ ६० टक्के मतदार हे झोपडपट्टीधारक आहेत. हा प्रभाग १० ते १२ कॉलन्यांनी बनला आहे.

२००५ मध्ये गोरख माने यांनी अपक्ष निवडून येऊन या प्रभागाचे प्रतिनिधित्व केले होते. २०१० मध्ये राजश्री साबळे या प्रभागातून महापालिकेत गेल्या होत्या. २०१५ मध्ये झालेल्या तुल्यबळ लढतीत काँग्रेसच्या लाला भोसले यांनी राष्ट्रवादीच्या मुस्ताक मलबारी यांचा १५९ मतांनी पराभव करत महापालिका गाठली होती.

सध्या हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला असून गेली अनेक वर्षे लोकांच्या संपर्कात असलेल्या शशिकांत पाटील यांनी पत्नी शुभांगी पाटील यांच्यासाठी काँग्रेसमधून उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसमधून अर्चना बिरंजे, स्नेहा मयूर पाटील, छाया कांबळे, संगीत चक्रे, वैशाली मिसाळ यांचीही नावे चर्चेत आहेत, तर अन्य पक्षांतून कोमल बिरजे, नागटिळे हेही इच्छुक आहेत.

गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते...

लाला भोसले : (काँग्रेस) १४९५

मुस्ताक मलबारी : (राष्ट्रवादी) १३३६

प्रदीप डवरी : (अपक्ष) 124

मोहन मोरे : (शिवसेना) ९२

कोट :

गेल्या पाच वर्षात या प्रभागात दोन कोटी साठ लाख रुपयांची विकासकामे केली असून भागातील अनेक समस्या सोडवल्या आहेत. यामध्ये रस्ते, गटर्स, गार्डन, पाईपलाईन, ओपन जिम ही कामे मार्गी लावली आहेत.

- विद्यमान नगरसेवक : लाला भोसले : (काँग्रेस)

सोडविलेले प्रश्न : अंतर्गत रस्ते, गार्डन, प्रभागातील गटर्स, पाण्याच्या पाईपलाईन, एलईडी, ओपन जिम, वृक्षारोपण...

प्रभागातील समस्या...

पाणीटंचाई, ड्रेनेज लाईनची मुख्य समस्या असून बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकलेली नाही,

रस्त्यावरच कचरा पसरत असल्याने दुर्गंधी पसरते, अनेक ठिकाणची गटर्स व्यवस्थित नसल्याने दुर्गंधी पसरते व नागरिकांना आजाराचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणचे रस्ते उखडले आहेत.