शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गुटखानिर्मितीची पाळेमुळे ग्रामीण भागातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:40 IST

संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : दोन वर्षांपूर्वी कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथे गुटखानिर्मिती कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी बेकायदेशीर गुटख्यावर कारवाई केली होती. पुन्हा कोंडिग्रे येथेच बेकायदेशीर गुटखा साठ्यावर कारवाई झाल्यामुळे गुटखानिर्मितीची पाळेमुळे ग्रामीण भागातच ठळकपणे जाणवत आहेत. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणाºया अन्न-औषध प्रशासन आणि पोलीस यांच्याकडे संशयाच्या सुईचा निर्देश होत ...

संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : दोन वर्षांपूर्वी कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथे गुटखानिर्मिती कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी बेकायदेशीर गुटख्यावर कारवाई केली होती. पुन्हा कोंडिग्रे येथेच बेकायदेशीर गुटखा साठ्यावर कारवाई झाल्यामुळे गुटखानिर्मितीची पाळेमुळे ग्रामीण भागातच ठळकपणे जाणवत आहेत. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणाºया अन्न-औषध प्रशासन आणि पोलीस यांच्याकडे संशयाच्या सुईचा निर्देश होत आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचा पाया खणून काढला पाहिजे. ज्यामुळे या दोन्ही खात्यांचीही जरब अबाधित राहिल्यास बेकायदेशीर गुटखानिर्मिती व विक्रीवर चाप बसणार आहे.आघाडी सरकारच्या काळात गुटखाबंदीचा निर्णय झाला होता. मात्र, गुटख्यावरील बंदीचा निर्णय नावापुरता शिल्लक राहिला आहे. कारवाई होते, संशयित जामिनावर पुन्हा मोकाट सुटतात व नव्याने गुटखानिर्मितीचा उद्योग सुरू होतो, हे कोंडिग्रेच्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे. १५ सप्टेंबर २०१५ रोजी जयसिंगपूर पोलिसांनी कोंडिग्रे येथे गुटखानिर्मिती कारखान्यात छापा टाकून गुटखा मिक्सिंग करणाºया दोन मशिनरींसह विविध कंपन्यांचे पाऊचदेखील जप्त केले होते. सहा लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त करून दहाजणांना अटक करण्यात आली होती. गुटखानिर्मितीचा मुख्य सूत्रधार हा इचलकरंजी येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.या कारवाईनंतर गुटखा हद्दपार होईल, असे वाटत असताना कोंडिग्रे येथे बुधवारी (दि.२२) अन्न व औषध प्रशासन व पोलीस पथकाने छापा टाकून आठ लाख रुपयांचा गुटखा व एक लाख रुपये किमतीचे पॅकिंग मशीन व साहित्य जप्त केले. गुटखा वाहतूक करण्यासाठी आलेला टेम्पो गांधीनगर येथील असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने सांगितले. मात्र, गुटखासाठा करण्यात आलेले गोडावून कोणाच्या मालकीचे, यामागील सूत्रधार कोण, याचा तपास करण्याचे आव्हान अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलिसांसमोर आहे. गुटखानिर्मिती करणारे कारखाने ग्रामीण भागात पोहोचल्यामुळे यावर जरब बसविणार तरी कोण, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.जयसिंगपूर कनेक्शनकोंडिग्रे येथे बुधवारी कारवाई झाली. यावेळी या कारवाईची कुणकुण संबंधिताला लागल्यामुळे या गोडावूनमध्ये टेम्पोचालकाव्यतिरिक्त अन्य कोणीही सापडले नाहीत. दोन वर्षांपूर्वी कारवाई झाली होती. त्या उद्योगाचा मुख्य सूत्रधार इचलकरंजी येथील असल्याचे स्पष्ट झाले होते, तर यावेळच्या या उद्योगाचा सूत्रधार जयसिंगपूर येथील असल्याची चर्चा आहे.ग्रामीण भागात गुटख्याचा उद्योगजैनापूर माळभाग येथे गुटखानिर्मिती करणारा कारखाना दोन महिन्यांपूर्वी बंद झाला होता. कारवाईची कुणकुण लागल्यानंतरच येथील गुटख्याचा साठा व पाऊच नष्ट करण्यात आले. ग्रामीण भागात कारवाई होत नसल्यामुळे हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. यामुळे कोंडिग्रे व जैनापूर या ग्रामीण भागात गुटखानिर्मितीचे उद्योग वाढले.