शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात ‘बैत्या’ला घरघर

By admin | Updated: October 29, 2014 00:14 IST

बलुतेदारांचे लक्ष नोकरी, करिअरकडे

शिवराज लोंढे - सावरवाडी -पूर्वी धान्याच्या रूपात बैतं घालण्याची प्रथा होती. सुगीच्या दिवसांत खळ्यावर भटक्या जमातीच्या लोकांची वर्दळ असायची. शेतकऱ्यांची वर्षभराची कामे बैत्यावर चालत असत. बदलत्या जमान्यात मात्र ही बैत्याची परंपरा नामशेष होऊ लागली आहे. त्यामुळे सुगीच्या दिवसांत ग्रामीण भागात बाराबलुतेदारांची खळ्यावरची वर्दळ कमी झाली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या बैलाच्या औताचे लाकडी साहित्य बनविणे, खुरपी पाजविणे (धार काढणे), आवातणे देणे, गणपतीच्या मूर्ती देणे यांसारखी शेतकऱ्यांची कामे बाराबलुतेदार करून देत असत. शिक्षणामुळे ग्रामीण भागातील समाजाची प्रगती झाली. त्यामुळे बाराबलुतेदार वर्गातील सुशिक्षित पिढी नोकरी, उद्योगधंद्याकडे वळली. कच्च्या मालांच्या दरात वाढत्या महागाईमुळे बाराबलुतेदारांना शेतकऱ्यांना बैत्यावर सेवा देणे परवडत नाही. त्यामुळे बैत देण्याची पूर्वीची प्रथा सध्या नव्या जमान्यात बंद पडू लागली आहे. जुन्या काळातील रूढी-परंपरा या नव्या पिढीला रुचल्या नाहीत. त्यामुळे बैतं देणे ही संकल्पना सध्या कालबाह्य होऊ लागली आहे. धान्याच्या मोबदल्यात सेवा देण्याऐवजी पैसे देऊन अथवा वस्तू विकत घेणे-देणे ही प्रथा सध्या सुरू झाली. शेतीमध्ये सुशिक्षित लोक येत आहेत. त्यामुळे पैशांच्या मोबदल्यात वस्तूंची सेवा घेणे शेतकरीवर्ग अधिक पसंद करू लागला आहे. यामुळेही धान्यांच्या रूपात बैतं घालण्याची प्रथा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. बाजारपेठेत नव्या सुधारित पद्धतीची शेती औजारे, वस्तू मिळू लागल्या आहेत. त्यामुळे कुंभार, सुतार, लोहार कारागिरांची कलाही कमी होऊ लागली. जमाना बदलत असून नवनवीन संशोधन कृषी क्षेत्रात येऊ लागले. परिणामी जुन्या प्रथाही हळूहळू कमी होऊ लागल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.