शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

‘देवा’च्या जमिनीसाठी न्यायालयात ‘धावा’!

By admin | Updated: September 26, 2015 00:18 IST

करारपत्रांचा आधार : न्यायालयानेही घातली धर्मादाय आयुक्तांच्या पूर्वपरवानगीची अट--‘इंचनाळ गणपती’च्या जमिनीची कुळकथा

राम मगदूम-गडहिंग्लज इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील श्री गणपती देवाच्या जमिनीचे वहिवाटदार गजानन बाळकृष्ण जोशी यांनी नेमलेले ‘वटमुखत्यार’ मनोहर बाळकृष्ण जोशी यांनी संबंधित जमिनीच्या विक्रीपोटी रक्कम स्वीकारून जमीन खरेदी देण्यासाठी टाळाटाळ केल्यामुळे करारपत्र करून घेतलेल्या आनंदराव धोंडिबा पोवार यांनी जमिनीचे खरेदीपत्र होऊन मिळावे, यासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयानेदेखील धर्मादाय आयुक्तांच्या पूर्वपरवानगीनेच या जमिनीचा ‘व्यवहार’ करावा, असा निकाल दिला.वटमुखत्यार मनोहर जोशी-दंडगे यांनी देवस्थानच्या व्यवस्थापनेसाठी उत्पन्न अपुरे आणि प्रत्यक्ष जमिनी कसणे अडचणीचे होऊ लागल्याने अनिलकुमार राजाराम दड्डीकर यांच्याकडून १० डिसेंबर २००० रोजीच्या करारपत्राने दोन लाख ८५ हजार रुपये स्वीकारले व दहा वर्षे व्याजामध्ये उपभोगण्यास जमीन दिली. मात्र, सदरच्या व्याजात देवस्थानचे व्यवस्थापन होईनासे झाल्याने त्यांनी या जमिनी १६ लाखांच्या मोबदल्यात खरेदी देण्याचे ठरवून संचकारादाखल दहा लाख स्वीकारून तसे करारपत्र आनंदराव पोवार यांना १७ आॅक्टोबर २००३ रोजी लिहून दिले.दरम्यान, उर्वरित रक्कम घ्या व जमिनीचा कब्जा द्या, तसेच खरेदीपत्र पूर्ण करून द्या, अशी विनंती वेळोवेळी पोवार यांनी मनोहर यांच्याकडे केली. त्यावेळी दड्डीकर यांचे पैसे भागविण्यासाठी त्यांनी पोवारांकडून दोन लाख ८५ हजार रुपये घेतले व जमिनीचा कब्जा पोवारांच्या ताब्यात दिला. त्याबाबतचे पुरवणी करारपत्र ११ डिसेंबर २००९ रोजी करून दिले.तथापि, धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेऊन खरेदीपत्र पूर्ण करून देण्यास मनोहर जोशी-दंडगे यांनी टाळाटाळ केल्यामुळे पोवारांनी करारपत्राप्रमाणे जमिनीचे खरेदीपत्र होऊन मिळण्यासाठी गडहिंग्लजच्या वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात २८ डिसेंबर २००९ला दावा दाखल केला. या दाव्याची गुण-दोषांवर चौकशी होऊन करारपत्राप्रमाणे उर्वरित रक्कम दोन लाख ६९ हजार ५०० रुपये स्वीकारून सहा महिन्यांच्या आत धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेऊन खरेदीपत्र पूर्ण करून द्यावे, आणि त्यांनी परवानगी नाकारल्यास दरसाल ६ टक्के व्याजदराने १३ लाख ३० हजार ५०० रुपयांची वसुली पोवारांना करता येईल, असा निकाल न्यायालयाने २२ सप्टेंबर २०१४ रोजी दिला.या दाव्याच्या निकालानंतर पोवार यांनी गट नंबर २७३/१अ व २७३/१ब चे पीक पाहणी सदरी नोंद होण्यासाठी २० जानेवारी २०१५ व ११ फेब्रुवारी २०१५, असे दोन अर्ज तहसीलदारांकडे केले. त्यानुसार आॅगस्ट २०१५ मध्ये पीक पाहणी संदर्भात गावभेठीची सूचना तहसीलदारांनी वहिवाटदारांना नोटिसीद्वारे दिल्याचे ग्रामस्थ व गणेशभक्तांना समजले. त्यामुळेच त्यांनी देवस्थानची जमीन वाचविण्यासाठी तहसीलदारांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि धर्मादाय आयुक्तांपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा दरवाजा ठोठावला आहे. (समाप्त)‘जमीन खरेदी’साठी असा झाला खटाटोप१७ आॅक्टोबर २००३ : देवस्थानची सहा एकर २९ गुंठे जमीन आनंदराव पोवार यांना १६ लाखाला खरेदी देण्याचे ठरवून त्यापोटी दहा लाख संचकार स्वीकारून वटमुखत्यार मनोहर जोशी यांनी पोवारांना करारपत्र करून दिले.११ डिसेंबर २००९ : अनिलकुमार दड्डीकर यांची रक्कम भागविण्यासाठी मनोहर जोशी यांनी दोन लाख ८५ हजार रूपये घेतले व जमिनीचा कब्जा पोवारांच्या ताब्यात दिला.२८ डिसेंबर २००९ : जमीनीचे खरेदीपत्र होऊन मिळण्यासाठी पोवारांची न्यायालयात धाव.२२ सप्टेंबर २०१४ : प्रतिवादींनी सहा महिन्यांच्या आत धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेऊन खरेदीपत्र पूर्ण करून द्यावे व परवानगी न मिळाल्यास दरसाल ६% टक्के व्याजदराने १३ लाख ३० हजार ५०० रूपयांची वसुली वादींना करता येईल, असा न्यायालयाचा निकाल आहे.