शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

BS4 वाहनांवर मिळतेय बंपर सूट? अफवांमुळे शोरुमचे कर्मचारी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 16:51 IST

सर्व प्रकारच्या बी. एस. फोर वाहनांची नोंदणी ३१ मार्चपर्यंतच केली जाणार आहे. त्यामुळे अशी वाहने विक्रेते कमी किमतीत विकत असल्याच्या अफवांचे पीक उठले आहे. प्रत्यक्षात अशी वाहनांची उपलब्धता नगण्य असून तीही नियमित किमतीलाच विक्री केली जात आहेत.

ठळक मुद्देदुचाकी, चारचाकी वाहनांची उपलब्धता नगण्य दुचाकी कोणतीही विका; हेल्मेट देणे बंधनकारक

कोल्हापूर : सर्व प्रकारच्या बी. एस. फोर वाहनांची नोंदणी ३१ मार्चपर्यंतच केली जाणार आहे. त्यामुळे अशी वाहने विक्रेते कमी किमतीत विकत असल्याच्या अफवांचे पीक उठले आहे. प्रत्यक्षात अशी वाहनांची उपलब्धता नगण्य असून तीही नियमित किमतीलाच विक्री केली जात आहेत.देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बी.एस.फोर मानांकनाच्या सर्व प्रकारची वाहनांची नोंदणी ३१ मार्चपर्यंत करावी; नोंदणी न झालेली वाहने स्क्रॅप केली जावीत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे अशा शिल्लक राहिलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांचे करायचे काय, असा प्रश्न वितरकांपुढे पडला आहे, असा समज अनेकांनी करून घेतला आहे.

त्यामुळे सोशल मीडियावर अमुक एक गाडी अमुक किमतीला किंवा ५० टक्के कमी किमतीत अशा एक ना अनेक अफवांचे पीक उठले आहे. प्रत्यक्षात अशा स्वरूपाचे कोणतीही सूट वितरकांकडून दिली जात नाही. उलट काही प्रकारच्या दुचाकी ग्राहकांना हव्या असतानाही त्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नाहीत; त्यामुळे अशा बीएसफोर वाहनांची उपलब्धता नगण्य असून किमतीही नियमितच आहेत.नोंदणीसाठी उरले काही दिवसअशी वाहने ज्यांनी खरेदी केली आहेत, त्यांनी ती २० मार्च २०२० पर्यंत कागदपत्रांची पूर्तता करून गुढीपाडवा (दि. २५) हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसह घरी नेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. त्यामुळे बी.एस.फोर वाहनांच्या नोंदणीसाठी अवघे १० ते १५ दिवस उरले आहेत.हेल्मेट देणे बंधनकारकदुचाकीची विक्री केल्यानंतर विक्रेत्याने ग्राहकांना दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. वाहन नोंदणी करताना बंधपत्र सादर करणे बंधनकारक आहे. हेल्मेट दिले नसल्याचे आढळून आले तर अशा विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी स्पष्ट केले आहे. 

 

टॅग्स :carकारkolhapurकोल्हापूरRto officeआरटीओ ऑफीस