शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

सत्ताधारी पॅनेलची बाजी

By admin | Updated: May 15, 2016 00:44 IST

खाटीक समाज निवडणूक : चौदा वर्षांनंतर पहिल्यांदा निवडणूक

कोल्हापूर : अत्यंत अटीतटीने व अतिशय चुरशीने झालेल्या कोल्हापूर खाटीक समाजाच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी रात्री जाहीर होऊन यामध्ये ‘खाटीक समाज विकास आघाडी’ (संयुक्त पॅनेल)ने बाजी मारली. पॅनेलने सर्वच ११ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवत विरोधी ‘खाटीक समाज जनरल मटण मार्केट परिवर्तन पॅनेल’चा पराभव केला. विजयानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल-फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष केला. तब्बल चौदा वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडणूक लागली आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी ‘खाटीक समाज विकास आघाडी’ (संयुक्त पॅनेल), तर माजी उपमहापौर कै. हरिभाऊ दत्तात्रय प्रभावळकर (बापू) प्रणित ‘खाटीक समाज जनरल मटण मार्केट परिवर्तन पॅनेल’ अशी दोन पॅनेल रिंगणात होती. दोन्ही पॅनेलनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली होती. दोन जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्याने ११ जागांसाठी ही निवडणूक लागली होती. लक्ष्मीपुरी येथील कोल्हापूर खाटीक समाजाच्या सभागृहात शनिवारी सकाळी १० वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. या निवडणुकीत दिसून आली. एकेका मतासाठी चढाओढ सुरू होती. दुपारी तीनपर्यंत मतदानाची वेळ होती; परंतु मतदारांची संख्या पाहता, प्रत्यक्षात ही प्रक्रिया दुपारी ४.३० च्या सुमारास संपली. एकूण १६६९ पैकी ११८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर काही वेळातच निवडणूक निर्णय अधिकारी ए. एन. शेख यांनी मतमोजणीला सुरुवात केली. बॅलेट पेपर असल्याने मतमोजणी प्रक्रिया धिम्या गतीने सुरू होती. अखेर तब्बल साडेपाच तासांनंतर ही मतमोजणी प्रक्रिया संपली. रात्री दहाच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी शेख यांनी सत्ताधारी पॅनेलचे सर्वच पॅनेल विजयी झाल्याचे घोषित केले. यानंतर सत्ताधारी पॅनेलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष सुरू केला. विजयी उमेदवारांची नावे व कंसात मिळालेली मते : सर्वसाधारण धनाजी वसंतराव कोतमिरे -(६११), विजय लक्ष्मणराव कांबळे - (६०८), उत्तम रामचंद्र कांबळे - (५१८), शैलेंद्र बाळासो घोटणे - (५९५), जयदीप विष्णुपंत घोटणे - (५८७),किरण बाबूराव कोतमिरे - (५८४), शिवाजी गणपतराव घोटणे - (५७९), बाळासो गणपती जाधव - (५५४), विलास जानवेकर - (५५१), संजय भोपळे - (५४७), महिला राखीव : मीना शशिकांत प्रभावळे (५६८)