शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
2
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
3
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
4
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
5
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
7
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
8
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
9
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
10
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
11
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
12
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
13
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
14
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
15
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
16
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
17
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
18
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
19
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
20
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...

बांधकामासाठीच्या अवजड वाहनांच्या वापराचे नियम बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 11:40 IST

बांधकामासाठीच्या अवजड वाहनांच्या गैरसोईच्या आणि दंडाचा भुर्दंड लादणाऱ्या नियमांत अखेर बदल झाला आहे. उंची ११ वरून १४ फुटांपर्यंत वाढवण्यात आल्याने अर्थमूव्हिंग वाहनधारकांच्या बऱ्याच वर्षांच्या मागणीला यश आले आहे.

ठळक मुद्देखासदार संजय मंडलिक यांच्या प्रयत्नांना यश उंचीत तीन फुटांनी वाढ झाल्याने अर्थमूव्हिंग वाहनधारक समाधानी

कोल्हापूर : बांधकामासाठीच्या अवजड वाहनांच्या गैरसोईच्या आणि दंडाचा भुर्दंड लादणाऱ्या नियमांत अखेर बदल झाला आहे. उंची ११ वरून १४ फुटांपर्यंत वाढवण्यात आल्याने अर्थमूव्हिंग वाहनधारकांच्या बऱ्याच वर्षांच्या मागणीला यश आले आहे.

कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी उठविलेला आवाज आणि केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी १९८९ च्या नियमांत बदल केल्याची घोषणा केली आहे. याचा लाभ देशभरातील वाहनधारकांना होणार आहे.बांधकामासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या ट्रेलरसह इतर वाहनांतून नेल्या जाणाऱ्या मालासाठी ११ फूट इतकी उंचीची मर्यादा होती. इतर मालवाहतुकीच्या वाहनांपेक्षा ही वाहने उंचीला एक फुटाने जास्त असतात. त्यांची मानके आंतरराष्ट्रीय मानकानुसार ठरविली जातात. अशा वाहनांमध्ये कोणतेही बदल करता येत नाहीत. त्यामुळे अशा वाहनांतून अवजड यंत्रसामग्रीची वाहतूक करताना कोट्यवधीचा दंड भरावा लागत आहे. दंड भरेपर्यंत हे वाहन थांबवून ठेवले जात असल्यामुळे सर्व कामांचा खोळंबा होत होता.देशभरातील पायाभूत प्रकल्पांसाठीची यंत्रसामग्री कोल्हापुरातून जाते. त्यामुळे या यंत्रांची वाहतूक करताना होणाऱ्या अडचणी येथील वाहनधारकांना जास्त जाणवत होत्या. कोल्हापूर जिल्हा अर्थमूव्हर्स असोसिएशनने यात बदल करण्याची मागणी सातत्याने लावून धरली.

खासदार संजय मंडलिक यांच्याकडेही या शिष्टमंडळाने पाठपुरावा करीत केंद्रीय मंत्र्यांकडे ही तांत्रिक बाजू मांडावी, असा आग्रह धरण्यात आला होता. त्यानुसार मंडलिक यांनी हा प्रश्न मनावर घेऊन सोडविला.याबद्दल अर्थमूव्हिंग असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील-सडोलीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खासदार मंडलिक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आभार मानले. यावेळी अभय देशपांडे, प्रताप कोंडेकर, श्रीकांत घाडगे, निवृत्त परिवहन अधिकारी रवींद्र भागवत, राजाराम मगदूम, महेश धनवडे, संजय कसबेकर, संजय नाळे, अमोल पाटील, श्रीकांत घाटगे, संजय पाटील, दीपक नलवडे, रंगराव पाटील, सुरेश कुऱ्हाडे, विज्ञान मुंडे, नितीन पाटील उपस्थित होते.दंडातून कायमची सुटकामोटार वाहन कायदा १९८९ मधील नियमानुसार अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनाची उंची ३.६ मीटर अर्थात ११ फूट आहे. त्यात आता सुधारणा झाल्याने ही उंची ४.७५ मीटर अर्थात १४ फूट इतकी झाली आहे. उंचीत तीन फुटांनी वाढ झाल्याने आता दंडातून कायमची सुटका झाली आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर