जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, कोल्हापूर-राधानगरी रोडच्या मुख्य रस्त्यावरील दुकानांचे बाहेरून शटर बंद असले तरी दुकाने सुरूच असल्याचे चित्र आहे. यामुळे या ठिकाणी एकमेकांचा संपर्क होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
संचारबंदीच्या काळात या रोडवर विना मास्क फिरणाऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच गल्लीबोळांत टवाळखोर मुले दुचाकीवरून विनाकारण फिरत असल्याचे चित्र आहे.
हळदी व इतर परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढला असून, एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच बुधवारी दुकानदारांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. यामध्ये दोन दुकानदार पॉझिटिव्ह आले असून, या काळातही त्यांची दुकाने सुरू असल्याचे सांगितले जात आहे. संचारबंदीच्या काळात हे सर्रास सुरू असताना करवीर पोलीस, महसूल विभाग, ग्रामपंचायत प्रशासन सुस्त झाले असून, मागील आठ दिवसांच्या संचारबंदीच्या काळात एकही दंडात्मक कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे.