शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

नियमानुसार कारभार करण्याची गरज

By admin | Updated: June 1, 2015 00:16 IST

इचलकरंजी नगरपालिका : लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रशासनाकडून नागरिकांची अपेक्षा

राजाराम पाटील -इचकरंजी  -नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत कॉँग्रेस व शहर विकास आघाडी या दोन्ही पक्षांनी कूपनलिकांवरील पाणबुडे पंप व पाण्याच्या टाक्यांच्या निविदेतील सव्वा कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आणला. तर आमदार सुरेश हाळवणकर यांनी २१ मे रोजी पालिकेतील प्रशासनाची झाडाझडती घेऊन कारभारावर ताशेरे ओढले. अशा गंभीर घटनांपासून बोध घेत पालिकेतील पदाधिकारी व प्रशासन दोघांनीही आत्मकेंद्रित होऊन नियम व कायद्याच्या चौकटीत कामकाज करण्याची वेळ आली आहे.साधारणत: दहा वर्षांपूर्वी नगरपालिकेच्या राजकारणात दिग्गज ज्येष्ठ नगरसेवक होते. त्यावेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रशासन या तिघांवरही एक वचक असे. योग्य नियोजनाने नियम व कायद्याच्या चाकोरीत नगरपालिकेचे कामकाज चालत असे. पण अलीकडील काळात नवनवीन लोकप्रतिनिधी व काही कारभाऱ्यांच्या तालावर चालणारे प्रशासन पालिकेत आल्याने कारभारात सावळागोंधळ सुरू झाला. अगदी नगरसेवकच मक्तेदार होऊ लागल्याने गैरव्यवहार व आर्थिक वाटाघाटींनी सीमारेषा ओलांडली.डिसेंबर २०१४च्या अखेरीस पक्षांतर्गत दिलेली मुदत संपूनही नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. त्यांच्या बंडाला शहर विकास आघाडी व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला. नंतर उर्वरित कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या जांभळे गटानेही त्यांच्याशी मिळते-जुळते घेतले. मग ‘सबका साथ, सबका विकास’ तत्त्वाने सर्वच सत्तेत आले. नवनवीन कारभारी झाले आणि येथूनच कामकाजाचा खेळखंडोबा होण्यास सुरूवात झाली.मागील आठवड्यात ‘शविआ’चे नगरसेवक प्रमोद पाटील, अध्यक्ष जयवंत लायकर, मदन झोरे यांनी बांधकाम विभागातील कारभाराच्या तक्रारी केल्या. तर नगरसेवक संतोष शेळके यांनी उपोषण केले. त्यानिमित्ताने नगरपालिकेत आलेले आमदार सुरेश हाळवणकर यांनी तडक मुख्याधिकारी सुनील पवार यांच्या कार्यालयात जाऊन प्रशासनाची झाडाझडती घेतली. नगरपालिका आहे की धर्मशाळा, असे ताशेरे मारत काही नगरसेवक मक्तेदार असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना गोपनीय अहवाल द्या, असे हाळवणकरांनी सूचित केले.शनिवारच्या नगरपालिकेच्या सभेत नगरसेवक शशांक बावचकर व अजित जाधव यांनी कूपनलिकांवर बसविण्यात येणाऱ्या पाणबुडे पंप व पाण्याच्या टाक्यांमध्ये सव्वाकोटींचा गैरव्यवहार बाहेर काढत प्रशासनाचे वाभाडे काढले. यावेळी मुख्याधिकारी पवार यांनी आता फक्त नियम व कायद्यानुसारच पालिकेचे कामकाज चालवू. त्यासाठी नगरसेवक व व्यवहारांशी सांगड घालणार नाही, असा इशारा दिला. अशा घटनांनी आता लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रशासनाने आत्मकेंद्रित होऊन नियम व कायद्यानेच कारभार हाकावा, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.