शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मल्लेवाडीत गव्यांचा धुडगूस

By admin | Updated: January 28, 2015 01:01 IST

वनविभाग सुस्त : दहा एकरांतील पिके उद्ध्वस्त

म्हालसवडे : तेरसवाडी (ता. करवीर) पैकी मल्लेवाडी, भोगमवाडी व कदमवाडी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून गव्यांनी धुडगूस घातला आहे. मल्लेवाडीतील दहा एकर क्षेत्रांतील ऊस, शाळू, मका व वरणा पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले आहे. वनविभागाने जंगली प्राण्यांचा व गव्यांचा बंदोबस्त ताबडतोब करावा, अशी मागणी होत आहे.दाजीपूर अभयारण्यातील गवे ओल्या चाऱ्याची टंचाई जाणवू लागताच तुळशी व धामणी परिसराकडे येत आहेत. सलग चौथ्या वर्षी गवे सातेरी डोंगरमाथ्यावरील लोळजाई परिसरातील जंगली भागात उन्हाळ्याच्या दिवसांत वस्ती करू लागले आहेत. या परिसरातील मल्लेवाडीतील नागरिकांना या प्राण्यांनी हैराण करून सोडले आहे.पाझर तलाव व विहिरींच्या पाण्यावर ऊस, गहू, शाळू, मका व वरणा अशी उन्हाळी पिके घेतली जातात. परिसरात सलग चार वर्षे गव्यांच्या तीन ते चार कळपांचे वास्तव्य वाढू लागले आहे. सध्या येथे सात गव्यांचा कळप दाखल झाला आहे. मल्लेवाडी येथील खजिना नावाच्या शेतातील तुकाराम आवाड, निवृत्ती आवाड, शिवाजी आवाड, बळवंत पेंढरे, तुकाराम पेंढरे, सर्जेराव पेंढरे आदी शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त केली आहेत. याच परिसरातील कदमवाडी, भोगमवाडी, धनगरवाडा परिसरातही गव्यांची दहशत सुरू आहे. रात्री फटाके वाजवून, डबे वाजवून ग्रामस्थ हाका घालत शेतात थांबत आहेत. नुकसानीची शासनाने चौकशी करून नुकसानभरपाई द्यावी व गव्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने वारंवार मागणी करूनही शासनाने अथवा वनविभागाने येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.- बाजीराव पाटील, शेतकरी, मल्लेवाडीग्रुप ग्रामपंचायत तेरसवाडीपैकी मल्लेवाडी, कदमवाडी, भोगमवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे गव्यांनी नुकसान केल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी व गव्यांचा बंदोबस्त करावा.- एम. जी. पाटील,ग्रामसेवक तेरसवाडी