शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
3
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
4
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
5
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
6
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
7
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
8
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
9
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
10
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
11
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
12
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
13
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
14
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
15
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
16
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
17
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
18
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
19
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
20
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा

रुद्रशी समीरचे व्यावसायिकही संबंध

By admin | Updated: September 21, 2015 00:31 IST

सांगलीत दोघे चालवायचे मोबाईलचे दुकान : मडगाव बॉम्बस्फोटानंतर भागीदारी तुटली

सुशांत कुंकळयेकर - मडगाव --कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अटक केलेला सनातनचा साधक समीर गायकवाड आणि मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार संशयित रुद्र पाटील या दोघांमध्ये व्यावसायिक संबंधही होते. २00६ पर्यंत रुद्र व समीर सांगलीत भागीदारीने मोबाईलचे दुकान चालवीत होते. रुद्र या हत्या प्रकरणाचा मास्टरमार्इंड असण्याची शक्यता पडताळून पाहत आहेत.मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणानंतर रुद्र पाटील फरार झाल्यानंतर समीरचीही एनआयएने चौकशी केली. या चौकशीमुळे सांगलीत समीरची काहीशी बदनामी झाली. त्यामुळेच त्याला दुकान बंद करावे लागले. ते बंद केल्यानंतर रोजीरोटीचा कोणताही मार्ग नसल्यामुळे सनातनचे काम त्याने सुरू केले, असे सनातनशी संबंध असलेले मुंबईचे वकील अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी सांगितले.मार्च २0११ पासून समीर सनातनचा धर्मरथ चालविण्याच्या कामावर होता. पानसरेंच्या हत्येनंतर त्याने कित्येकांशी फोनवरून संपर्क साधला होता. या संपर्कावरूनच पोलीस समीरपर्यंत पोहोचले. रुद्र पाटील याच्याकडे व्यावसायिक संबंध असल्यामुळेच पोलिसांची समीरवर नजर होती. पुनाळेकर म्हणाले, २00९ मध्ये मडगावात बॉम्बस्फोट झाल्यानंतर चौकशी करणाऱ्या एसआयटीने तसेच एनआयएने समीरची चौकशी केली होती. त्यावेळी सांगली येथील त्याच्या दुकानावरही पोलीस आले होते. यामुळेच त्याची बदनामी झाली होती. यानंतर दुकानमालकाने समीरकडून दुकान काढून घेतल्याने तो बेरोजगार झाला. पुनाळेकरांच्या म्हणण्याप्रमाणे समीरला फोन वारंवार बदलायची सवय होती. त्याशिवाय त्याचा स्वभाव थापाड्या होता. गोष्टी वाढवून सांगायची त्याला सवय होती. यामुळे तो गोत्यात आला. घमेंडखोर स्वभावानुसार तो बरळल्यामुळेच पोलिसांच्या जाळ्यात सापडला.काय म्हणते सनातन ?‘पोलिसांनी सनातनचे निष्पाप साधक समीर गायकवाड याला अटक केली आहे. आध्यात्मिक दृष्टीने सात्विक व सज्जन लोकांचा छळ करणे हे तामसी प्रवृत्तीचे लक्षण आहे. ही प्रवृत्ती साधना करूनच नष्ट होते. वाल्याचे वाल्मीकी ऋषी केवळ साधना करून झाले. या आध्यात्मिक सिद्धांतावर आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून सनातन अनेक वृत्तांत ‘आगामी हिंदू राष्ट्रात कठोर साधनेची शिक्षा करण्यात येईल’ असे म्हणते. येथे शिक्षा हा शब्द प्रातिनिधिक असून, साधनेद्वारे व्यक्तीचे पारमार्थिक कल्याण व्हावे, असा व्यापक दृष्टिकोन यामागे आहे’.