शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
3
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
4
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
5
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
6
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
7
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
8
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
9
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
10
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
11
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
12
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा
13
अनंत चतुर्दशी २०२५: घरच्या साहित्यात झटपट करा पेढ्याच्या चवीचे शाही मोदक; बाप्पा खुश आणि घरचेही 
14
रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती?
15
झोमॅटो आणि स्विगीच्या ग्राहकांना बसणार फटका? डिलिव्हरी शुल्कावर लागणार नवा कर
16
मुरूम कशासाठी उपसला? कुर्ड गावातील नागरिकांनी सत्य सांगितले; अजितदादांनी मध्यस्ती करत पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले होते
17
खासदार इंजिनिअर राशिद तिहार कारागृहात ट्रान्सजेंडर्समुळे त्रस्त; 'ते' HIV पॉझिटिव्ह असल्याचा AIP चा दावा
18
Zara, Nike सारख्या सर्व परदेशी ब्रँड्सना सरकारचा झटका; एका निर्णयानं डोकेदुखी वाढली, खरेदीवर परिणाम होणार?
19
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
20
भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?

‘आरएसएस’ने आंबेडकरांवर बोलणे योग्य नाही

By admin | Updated: April 16, 2016 00:43 IST

डोनथा प्रशांश : बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्या संयुक्तजयंती कार्यक्रमांतर्गत प्रेरणा सभा

कोल्हापूर : ज्यांचे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आहेत त्या ‘आरएसएस’ने आंबेडकरांवर बोलणे योग्य नाही, असे प्रतिपादन रोहित वेमुलाचा सहकारी व हैद्रराबाद केंद्रीय विद्यापीठाचा विद्यार्थी डोनथा प्रशांश यांनी शुक्रवारी येथे केले. दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांच्या हत्येतून ब्राह्मण्यवाद दिसत आहे. त्याला विरोधात आपली लढाई आहे; परंतु ही लढाई लढणाऱ्यांनाच देशद्रोही ठरविले जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी व महात्मा जोतिबा फुले यांची १८९ व्या संयुक्तजयंती कार्यक्रमांतर्गत शाहू स्मारक भवन येथे प्रेरणा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर, डॉ. ज. रा. दाभोळे, नंदकुमार गोंधळी, डॉ. सुनील पाटील, मच्छिंद्र कांबळे, संदीप संकपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.डोनथा प्रशांश म्हणाले, ‘आरएसएस’ची विचार प्रणाली ही डॉ. आंबेडकर यांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे त्यांनी आंबेडकरांवर बोलणे योग्य नाही. त्यांनी आंबेडकरांचे विचार समजून घेतल्यास ‘आरएसएस’ संपून जाईल. सध्या भारतावर पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कारवायांसंदर्भात बोलले जात आहे; परंतु दलित, मुस्लिम, ओबीसी यांच्यावर सुरूअसलेल्या अत्याचारावर बोलताना कोण दिसत नाही.डॉ. आंबेडकरांना आर्थिक व मानसिक आधार देण्याचे काम राजर्षी शाहू महाराज यांनी केले आहे. त्यामुळे ते आमचे प्रेरणास्रोत आहेत. सध्या जातीयवाद घट्ट होताना दिसत आहे. गावामध्ये असणारी जातीयता आता विद्यापीठांमध्येही आली आहे. या जातीयतेचा रोहित वेमुला बळी ठरला आहे. तो ब्राह्मण्यवादाचा बळी असून, या संदर्भात ब्राम्हणांविरोधात आवाज उठविला पाहिजे. सध्या हा ब्राम्हणवाद ‘आरएसएस’च्या माध्यमातून सुरूआहे. गावातील व विद्यापीठातील अत्याचार हे त्याचे द्योतक आहे. बाबासाहेबांचा हिंदूराष्ट्राला विरोध होता, तोच विचार आपण पुढे नेऊया.डॉ. भारत पाटणकर म्हणाले, पानसरे-दाभोलकर यांच्या हत्येचा सूत्रधार रुद्र पाटील याचा पोलिसांनी शोध घेण्यासाठी मे महिन्यापर्यंत मुदत देत आहे. या कालावधीत जर पोलिसांनी रुद्र पाटीलला शोधून काढले नाही तर आम्हीच त्याचा शोध घेऊ.ज. रा. दाभोळे म्हणाले, इचलकरंजी येथील कांबळे नावाची युवती सनातन संस्थेकडे कशी वळली? याचा शोध घेणे गरजेचे आहे. असे करण्यामागे तिचे कोणते दु:ख होते हे ही समजून घेतले पाहिजे.येथील शाहू स्मारक भवनात डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमांतर्गत प्रेरणा सभेला पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते उपस्थित होते. अनिल म्हमाणे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुनील पाटील यांनी स्वागत केले. मच्छिंद्र कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)मोदी, ठाकरे, अडवाणींसारखे नेते नकोतसांप्रदायिकतेवर देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या ठाकरे, मोदी व अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांऐवजी आम्हाला सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, अय्यपन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांची आवश्यकता असल्याचे प्रशांश यांनी सांगितले.