शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

१५०० रुपये अनुदान : रिक्षाचालकांकरिता स्वतंत्र ऑनलाइन कक्ष सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 16:15 IST

Shiv Sena Traffic Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षाचालकांसाठी जाहीर केलेले १५०० रुपयांचे अनुदान मिळण्याकरिता ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी स्वतंत्र ऑनलाइन व ऑफलाइन कक्ष प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्थापन करावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांच्याकडे केली.

ठळक मुद्दे१५०० रुपये अनुदान : रिक्षाचालकांकरिता स्वतंत्र ऑनलाइन कक्ष सुरू करा शिवसेनेतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे मागणी

कोल्हापूर : जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षाचालकांसाठी जाहीर केलेले १५०० रुपयांचे अनुदान मिळण्याकरिता ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी स्वतंत्र ऑनलाइन व ऑफलाइन कक्ष प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्थापन करावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांच्याकडे केली.जिल्ह्यातील १५ हजार २८७ परवानाधारक रिक्षाचालक आहेत. या रिक्षाचालकांना २ कोटी ३० लाख रुपये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलेले प्रत्येकी १५०० रुपयांचे अर्थिक सहाय मिळणार आहे. हे अर्ज कसे करावेत, याची माहिती रिक्षाचालकांना नाही. त्यामुळे यासाठी ऑनलाइन स्वतंत्र कक्ष स्थापन करावा. ज्यांच्याकडे कागदपत्रे नसतील त्यांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरून त्यात कार्यालयाकडील माहिती भरावी. जेणेकरून एकही रिक्षाचालक या अनुदानापासून वंचित राहणार नाही. याचा सहानभूतीपूर्वक विचार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने करावा.यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले, महाराष्ट्र रिक्षा सेनेचे अध्यक्ष राजू जाधव, कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देवणे, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShiv SenaशिवसेनाTrafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर