शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील बालकांना ‘रोटाव्हायरस’ची लस देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:53 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : डायरियासाठी कारणीभूत ठरणाऱ्या रोटाव्हायरसला प्रतिबंध करणारी ‘रोटासील’ ही लस देशभरातील सर्व ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : डायरियासाठी कारणीभूत ठरणाऱ्या रोटाव्हायरसला प्रतिबंध करणारी ‘रोटासील’ ही लस देशभरातील सर्व बालकांना मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या आजारामुळे प्रतिवर्षी ७८ हजार बालकांचा मृत्यू होतो. सध्या याबाबतचे प्रशिक्षण सुरू असून, १५ मे नंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे.डायरियामुळे १ ते ५ वयोगटांतील बालकांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या आजारामध्ये अंगातील पाण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊन बालकाला अशक्तपणा येतो. वय लहान असल्याने तोंडावाटे फारसे काही घेतले जात नाही. परिणामी त्याला रुग्णालयात दाखल करावे लागते. एकीकडे याचा खर्चही अधिक येत असताना दुसरीकडे हे बालक कुपोषित राहण्याची शक्यता असते.यावर उपाय म्हणून ज्यामुळे डायरिया होतो, त्या रोटाव्हायरस या व्हायरसला प्रतिबंध करणारी ही लस देण्यात येणार आहे. पावडरपासून तयार करण्यात येणारी ही लस इंजेक्शनच्या माध्यमातून तोंडात सोडली जाणार आहे.लसीकरण पूर्णपणे मोफतसध्या ही लस खाजगी दवाखान्यांमध्ये एक हजारहून अधिक किंमत आकारून दिली जाते; मात्र केंद्र शासनाच्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामध्ये या लसीकरणाचा समावेश झाल्याने याची कोणतीही किंमत आकारली जाणार नाही. बाळाच्या जन्मानंतर ६, १0 आणि १४ आठवड्यांनंतर ही प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.सध्या सुरू असलेले लसीकरण१ बीसीजी (क्षयरोग), २ पोलिओ,३ पेन्टा (मेंदूज्वर, कावीळ),४ कावीळ,५ एम. आर. (गोवर रूबेला), ६ डीपीटी लस (त्रिगुणी), ७ टीटी (धनुर्वात), ८ आयपीव्ही (इंजेक्टेबल पोलिओ व्हॅक्सिन) या आठ लसींबरोबरच आता ही नववी लस दिली जाणार आहे.डायरियामुळे देशभरातील ७८ हजार बालकांचा मृत्यू होत असल्याने या रोटाव्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा निर्णय केंद ्रशासनाने घेतला आहे. या लसीकरणामुळे हजारो बालकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका टाळणे शक्य होणार आहे.- डॉ. फारूक देसाई, माता बालसंगोपन अधिकारी,जिल्हा परिषद कोल्हापूर