अथर्व कंपनीने दौलत भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला असून कंपनीने गेले दोन गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. २०२१-२२ गळीत हंगामाकरिता व्यवस्थापनाने सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याच्या सध्याच्या डिस्टिलरीचे आधुनिकीकरण करून येत्या हंगामापासून कारखानाच्या इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित होत आहे. केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे धोरण स्वीकारल्यामुळे इथेनॉलला बाजारात चांगली मागणी आहे. त्यामुळे कारखान्यास आर्थिक लाभ होणार असून त्याचा फायदा ऊस उत्पादकांनाच मिळणार आहे. भविष्यात इतरही प्रकल्प विचाराधीन असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
या वेळी केन मॅनेजर एस. एन गदळे, चिफ केमिस्ट एस. एस. जाधव, डिस्टिलरी मॅनेजर एस. एन. माने, डिस्टिलरी इन्चार्ज एस. एस. पाटील, डे. चिफ इंजिनिअर बी. ए. पाटील, डे. फायनान्स मॅनेजर ओंकार शिंदे, कारखान्यातील इतर सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
१९ दौलत रोलर पूजन
फोटो ओळी :-- हलकर्णी (ता. चंदगड) येथे दौलत-अथर्व कारखान्यात मिल रोलर पूजनप्रसंगी गुंडू गावडे, धनंजय जगताप व कर्मचारी.