शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आवाराबाहेरील शेतीमाल विक्रीस पायबंद - :‘नियमन रद्द’चा वटहुकूमच निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:30 IST

बाजार समित्यांच्या आवाराबाहेर शेतीमाल विक्री करण्यास शेतकऱ्यांना मुभा देणारा वटहुकुमास राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने तो निकाली निघाला आहे. सरकारने आॅक्टोबर २०१८ मध्ये समित्यांच्या आवाराबाहेरील

ठळक मुद्देबाजार समित्यांचा पुन्हा अंकुश राहणारसरकारच्या निर्णयाने समित्यांच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने वटहुकुमाविरोधात बाजार समिती संघाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : बाजार समित्यांच्या आवाराबाहेर शेतीमाल विक्री करण्यास शेतकऱ्यांना मुभा देणारा वटहुकुमास राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने तो निकाली निघाला आहे. सरकारने आॅक्टोबर २०१८ मध्ये समित्यांच्या आवाराबाहेरील शेतीमालाचे नियमन रद्दचा निर्णय घेतला होता; पण आता पुन्हा बाजार समित्यांचा अंकुश राहणार आहे.

बाजार समिती कार्यक्षेत्रात शेतीमालाची खरेदी-विक्री केली तर मार्केट फी द्यावी लागते. त्याचबरोबर समितीच्या परवानगीशिवाय शेतकऱ्यांना बाहेर विक्री करता येत नाही. त्यामुळे शेतीमाल खरेदी-विक्रीवर समित्यांचे अंकुश राहतो; पण राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर समित्यांचे नियंत्रणच कमी करण्याचा निर्णय घेतला. समिती आवाराबाहेर शेतीमाल खरेदी-विक्री करण्याची मुभा सरकारने दिली होती. याबाबतचा २५ आॅक्टोबर २०१८ रोजी वटहुकूम काढला होता. या निर्णयाने समित्यांच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झाला होता.

व्यापारी शेतकºयांकडून कोठेही माल खरेदी करू लागल्याने मार्केट फी वसूल करता येत नाही, त्यामुळे अनेक समित्यांचे उत्पन्न निम्यावर आले होते. याविरोधात नोव्हेंबर २०१८ मध्ये राज्यातील बाजार समित्यांच्या पदाधिकाºयांची पुणे येथे बैठक झाली होती. सरकारच्या निर्णयाने समित्यांच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने वटहुकुमाविरोधात बाजारसमिती संघाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सहा महिन्यांच्या आत दोन्ही सभागृहांत मान्यता घेतल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होते. वटहुकुमाला २५ एप्रिलला सहा महिने पूर्ण झाले,वास्तविक सरकारने त्याला मुदतवाढ देण्याची गरज होती; पण तसे न केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने न्यायालयाने वटहुकूम कालबाह्य झाल्याने नियमनमुक्ती कायदेशीरदृष्ट्या अमलात असणार नाही, असा आदेश न्यायालयात दिल्याचे समजते.निवडणुकांसाठी समित्यांवर कर्जाची वेळनियमनमुक्ती आणि एकूणच उत्पन्नात मोठी घट झाल्याने राज्यातील ३०० पैकी २०-२५ समित्या सोडल्या तर इतर आतबट्ट्यात आल्या आहेत. कर्मचाºयांचे पगार भागवताना दमछाक उडत असून काहींचा निवडणूक कार्यक्रम लागला आहे. त्यात कार्यक्षेत्रात २० गुंठे जमीनधारकांना मतांचा अधिकार सरकारने दिल्याने हजारोंच्या पटीत मतदार आहेत. यासाठी मोठा बोजा पडला असून निवडणुकांसाठी कर्ज काढण्याची वेळ समित्यांवर आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार