शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

यात्रा समितीची भूमिका दुटप्पीपणाची !

By admin | Updated: April 27, 2016 00:57 IST

महालक्ष्मी मंदिर वाद : गडहिंग्लजच्या नगरसेवकांचा आरोप; मंदिराच्या विकासाला विरोध नाही

गडहिंग्लज : एकीकडे मंदिर विकासाला विरोध नाही, निधी परत जावा अशी आमची भूमिका नाही, असे म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला शासनाकडून तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या कामास विरोध करणे ही यात्रा समितीची भूमिका दुटप्पीपणाची आहे. केवळ विरोधाला विरोध म्हणून दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशा प्रवृत्तींना आळा घालण्याबरोबरच मिळालेल्या निधीतून शहराचा विकास करून घेण्यासाठी नागरिकांनी नगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी प्रसिद्धिपत्रकातून केले आहे.पत्रकात म्हटले आहे की, तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत गडहिंग्लज नगरपालिकेस शासनाकडून पाच कोटी ६९ लाखांच्या कामासाठी चार कोटी २६ लाख अनुदान मिळाले आहे. यापैकी एक कोटी २७ लाखांचे बेलबाग आश्रम आणि २४ लाख ५० हजार खर्चाचे नदीवेशीतील पिराची मुल्ला मस्जीद परिसर विकासाचे काम पूर्ण झाले आहे.गडहिंग्लज बसस्थानक ते तीर्थक्षेत्र स्थळापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण, गटर बांधकाम व फूटपाथवरील पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे दोन कोटी १४ लाखांचे कामही पूर्ण झाले आहे. तसेच मारुती मंदिर सभागृह बांधकामासाठी १८ लाख १७ हजार आणि विठ्ठल मंदिर सभागृह व भक्त निवासासाठी ३० लाख ४८ हजार मंजूर आहेत. ही दोनही कामेही जवळपास पूर्ण झाली आहेत. विठ्ठल मंदिर येथील अंशत: राहिलेले काम पूर्ण करून घेण्याचे ट्रस्टींनी मान्य केले आहे.श्री महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी एक कोटी २१ लाख मंजूर आहेत. त्यापैकी सभामंडपासाठी ५१ लाख ४९ हजार, स्टेजसाठी १९ लाख ५१ हजार, प्राथमिक शाळा/ धर्मशाळा बांधकामासाठी ६९ लाख ६५ हजार इतका निधी मंजूर आहे. या कामांमुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. महालक्ष्मी मंदिरात निधी परत जाऊ नये, यासाठी विधायक सूचना मांडण्यासाठी नागरिक, ट्रस्टी व यात्रा समिती यांची संयुक्त बैठक बोलावली होती. मात्र, तत्पूर्वीच पत्रकबाजी करून या विकासकामांना विरोध करण्याचा प्रयत्न यात्रा समितीने केला. बैठकीत विकासकामांबाबत चर्चा न करता उपस्थित काही मंडळींनी चर्चेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची भूमिका दुटप्पी आहे. केवळ व्यक्तिद्वेषातून राजकीय स्वार्थापोटी त्यांचा विरोध आहे. त्यामुळे निधी परत जाण्याची शक्यता आहे, असेही नगरसेवकांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.प्रसिद्धिपत्रकावर नगराध्यक्ष राजेश बोरगावे, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, बांधकाम सभापती नितीन देसाई, नगरसेवक बसवराज खणगावे, नरेंद्र भद्रापूर, दादू पाटील, रामदास कुराडे, किरण कदम, हारूण सय्यद, बाळू वडर, उदय पाटील, प्रा. स्वाती कोरी, सरिता भैसकर, मंजूषा कदम, लक्ष्मी घुगरे व सुंदराबाई बिलावर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)शाळेचा उपद्रव आताच कसा?महालक्ष्मी मंदिराच्या आवारात सुमारे १०० वर्षांपासून धर्मशाळा व प्राथमिक शाळा अस्तित्वात आहे. या शाळेचा यापूर्वी झालेल्या अनेक महालक्ष्मी यात्रांना उपद्रव झालेला नव्हता. त्यामुळे शहरातील गोर-गरिबांची मुले शिकणाऱ्या शाळेचा आताच कसा उपद्रव होतो? असा सवाल नगरसेवकांनी पत्रकातून विचारला आहे.