शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

स्वच्छता चळवळीतून रस्ते, मैदाने चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:29 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये स्वच्छता मोहिमेची चळवळ सुरू झाली असून, रविवारी सकाळी लोकसहभागातून शहराच्या विविध भागांत तसेच नाल्यांत महास्वच्छता ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये स्वच्छता मोहिमेची चळवळ सुरू झाली असून, रविवारी सकाळी लोकसहभागातून शहराच्या विविध भागांत तसेच नाल्यांत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानामध्ये ‘क्रिडाई’सह स्वयंसेवी, सेवाभावी संस्था, दिव्यांगबांधव, कृती समिती, तरुण मंडळे, तालीम संस्था, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यावेळी आठ जे.सी.बी. आणि १५ डंपरद्वारे एकूण २० डंपर गाळ व कचरा गोळा करण्यात आला. मोहिमेकरिता महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काम पाहिले.सकाळी दसरा चौकानजीक करवीर पंचायत समिती कार्यालयाजवळ महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते या मोहिमेस प्रारंभ झाला. या मोहिमेत नगरसेवकांसह माजी नगरसेवक, अधिकाऱ्यांसह नागरिकांनी श्रमदानासाठी लोकसहभाग दर्शविला. या चळवळीला यश येत असून, रविवारच्या महास्वच्छता मोहिमेला चांगलेच यश मिळाले. यापूर्वी नालेसफाईची मोहीम हाती घेण्यात आली होती; पण रविवारी नाल्यांसह शहर आणि उपनगरांतील अनेक उद्याने, मैदाने, रस्ते, फूटपाथवरील खुरटे गवत, कचरा कोंडाळे इथेही स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी नगरसेवकांसह नागरिकही पुढे आले. जयंती नाला, रंकाळा तलाव, श्याम सोसायटी येथील नाल्यातील गाळ जेसीबी मशीनद्वारे काढण्यात आला.अधिकाºयांसह लोकप्रतिनिधींनीही हातात झाडू घेऊन या स्वच्छता मोहिमेत उत्साहाने सहभाग घेतला. टोलविरोधी कृती समितीनेही या मोहिमेत सहभाग नोंदविला.यावेळी प्रभाग समितीचे सभापती शोभा कवाळे, राजसिंह शेळके, गटनेता विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, नगरसेविका अर्चना पागर, कविता माने, उमा बनछोडे, नगरसेवक रत्नेश शिरोळकर, संजय मोहिते, ईश्वर परमार, माजी नगरसेवक विनायक फाळके, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, सहायक आयुक्त संजय सरनाईक, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहायक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, उपशहर अभियंता रमेश मस्कर, आर. के. जाधव, एस. के. माने, हर्षजित घाटगे, एलबीटी आॅफिसर सुनील बिद्रे, इस्टेट आॅफिसर प्रमोद बराले, परवाना अधीक्षक राम काटकर, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक मदन चव्हाण, दुर्वास कदम, अनंत खासबारदार, उदय गायकवाड, दिलीप देसाई, कॉ. दिलीप पोवार, निवासराव साळोखे, केएमसी कॉलेजचे प्रकाश टिपुगडे, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी, ‘क्रिडाई’चे पदाधिकारी, स्वरा फौंडेशनचे कार्यकर्ते, महापालिकेच्या सर्व विभागांकडील कर्मचारी, आरोग्य विभागाकडील ३०० कर्मचारी, अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते व नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.दिव्यांग बांधवांनीवेधले लक्षमहास्वच्छता अभियानामध्ये दसरा चौकनजीक दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदविला. त्यांच्या सहभागाचे अनेकांनी कौतुक केले. त्यांनी अनेकांना लाजवेल अशा पद्धतीने स्वच्छता मोहिमेत काम करून दाखविले. त्यामुळे त्यांनी वाहवा मिळविली.