शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

प्रसंगी शाळेसाठी पालकांसोबत रस्त्यावर !

By admin | Updated: July 4, 2014 00:52 IST

कोळकींचा खुलासाच खोटा : भद्रापूर यांचा पलटवार

गडहिंग्लज : संकुचित राजकारणातूनच दिनकरराव शिंदेमास्तर शाळा इमारत बांधकामात अडथळे आणले जात आहेत. श्री महालक्ष्मीच्या गरीब भक्तांचीच मुले या शाळेत शिकत असल्यामुळे वारंवार कोर्टाच्या निकालाचा दाखला देत जागेच्या मालकीचा वाद उपस्थित न करता देवस्थान समितीने मोठ्या मनाने ही जागा शाळेसाठी नगरपालिकेला स्व:खुशीने द्यावी, अन्यथा शाळेच्या इमारतीसाठी पालकांना सोबत घेऊन मला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा नगरपालिका बांधकाम समितीचे सभापती नरेंद्र भद्रापूर यांनी पत्रकार परिषदेत दिला. ३० जूनच्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भद्रापूर यांनी येथील श्री लक्ष्मी मंदिर आवारातील प्राथमिक शाळेसाठी आरक्षित जागेवर वैदिक शाळा बांधण्याच्या प्रस्तावास तीव्र विरोध केला होता. त्यासंबंधीच्या खुलाशात देवस्थान समितीचे अध्यक्ष कोळकींनी प्रस्तावाची माहिती न घेताच भद्रापूरनी खोटी माहिती देऊन सभागृह व नागरिकांची दिशाभूल करण्याबरोबरच राजकारणातून विकासकामास विरोध करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यास भद्रापूर यांनी पुराव्यासह जोरदार प्रत्युत्तर दिले व कोळकींचा खुलासाच खोटा असल्याची टिप्पणी केली.लोकशाही संकेतानुसार पालिकेच्या सभागृहात व्यक्त केलेल्या आपल्या भावनेचा सभागृहाबाहेर झुंडशाहीने निषेध नोंदवून स्वतंत्र सत्तास्थान निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध नोंदवत असल्याचेही भद्रापूरनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी, नगरसेवक राजेश बोरगावे व बसवराज खणगावे, जनुसराज्य तालुकाध्यक्ष सोमगोंडा आरबोळे, शहराध्यक्ष बी. बी. पाटील, बाळासाहेब गुरव, रमेश रिंगणे, जितेंद्र पाटील, उदय परीट, अजित विटेकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)