शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

शिरोळमध्ये नदी वाचवा अभियान

By admin | Updated: September 22, 2015 23:50 IST

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : ५००० गणेशमूर्ती आणि पंधरा ट्रॉली निर्माल्य दान

जयसिंगपूर / कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यात नदी प्रदूषण टाळ्यासाठी निर्माल्य व मूर्तिदान आवाहनास गणेशभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरढोण, शिरोळसह परिसरामध्ये गणेश मूर्ती नदीत विसर्जित न करता दान करून नदी प्रदूषणाबाबत जागृती निर्माण झाल्याची जाणीव तालुक्यात दिसून येत आहे.जयसिंगपूर शहरात हजारो गणेशमूर्ती प्रत्येकवर्षी पंचगंगा आणि कृष्णा नदीपात्रात विसर्जित करण्यात येतात. निर्माल्यही नदीतच सोडण्यात येते. यामुळे नदी प्रदूषण होऊन पाण्यातील जीवसृष्टीस धोका निर्माण होतो. याची दखल घेऊन यावर्षी उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णा घाटावर उदगाव टेक्निकल हायस्कूल, ड्रीम इंडिया फौंडेशन व ग्रामपंचायतीने निर्माल्य व गणेश मूर्तिदान करण्याचे आवाहन गणेशभक्तांना केले. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मूर्तिदान केल्या. याठिकाणी दोन हजारांहून अधिक मूर्त्या जमा झाल्या होत्या. तर आठ ट्रॉल्या निर्माल्य जमा झाले होेते. जमा झालेल्या गणेशमूर्ती वापरात नसलेल्या विहिरीत विसर्जित केल्या. तर निर्माल्य हायस्कूलमध्ये त्याची खत निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अविनाश कडले व शंकर केंदुले यांनी येथे येऊन उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच प्रकाश बंडगर, ग्रामविकास अधिकारी संजय बंडगर सर्व कर्मचारी व फौंडेशनचे कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते. शिरोळमध्ये श्री दत्त साखर कारखाना व ग्रामपंचायतीच्यावतीने पंचगंगा घाटावर १६०० गणेशमूर्ती जमा झाल्या, तर चार ट्रॉल्या निर्माल्य गोळा झाले होते. कुरुंदवाडमध्ये नगरपालिका व एस. पी. हायस्कूल यांच्यावतीने नदी प्रदूषण रोखण्यासाठी शिरोळ-कुरुंदवाड दरम्यानच्या अनवडी पुलावर विसर्जन कुंड व निर्माल्य टाकण्यासाठी ट्रॉलीची व्यवस्था केली होती. सुमारे सहाशे मूर्त्या याठिकाणी जमा झाल्या होत्या. शिरढोण (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने गणेशमूर्ती व निर्माल्यदान उपक्रमाला ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. याठिकाणी सुमारे सातशे गणेशमूर्ती दान स्वरूपात मिळाल्या. ग्रामपंचायतीने प्रथमच ही मोहीम राबविल्याने ग्रामस्थांतून चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी जिल्हा परिषदेमार्फत पाणी पुरवठा विभागाचे अभियंता एम. एम. यादव, तालुका पंचायतीचे विस्तार अधिकारी एम. आर. कोळी यांनी भेट दिली. यावेळी ग्रामविकास अधिकारी आरकाटे, मधुकर सासणे, राजेखाण नदाफ, विश्वास बालिघाटे, विलास चौगुले, रावसो बिरोजे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)