शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
4
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
5
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
6
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
7
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
8
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
9
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
10
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
11
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
12
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
13
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
14
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
15
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
16
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
17
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
18
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
19
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
20
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

अर्जातील सर्व रकाने न भरल्यास उमेदवारी रद्द होण्याचा धोका

By admin | Updated: September 17, 2014 23:47 IST

अर्जातील सर्व रकाने न भरल्यास उमेदवारी रद्द होण्याचा धोका

इचलकरंजी : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जातील सर्व रकाने भरणे अत्यावश्यक आहे; अन्यथा उमेदवारी अर्ज रद्द होईल, असा इशारा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे यांनी दिला.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथील मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांची बैठक प्रांताधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी जिरंगे बोलत होत्या. बैठकीसाठी राष्ट्रीय कॉँग्रेसच्यावतीने अशोक केसरकर, भारतीय जनता पक्षाचे विलास रानडे, शहाजी भोसले, निधर्मवादी जनता दलाचे बशीर जमादार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दत्ता माने, रमेश पाटील, अ‍ॅड. भरत जोशी, संजय हणबर, पोलीस निरीक्षक सतीश पवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख, पालिकेचे कामगार अधिकारी विजय राजापुरे, आदी उपस्थित होते.जिरंगे म्हणाल्या, निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वच उमेदवारांकडून होणे अत्यावश्यक आहे. उमेदवार उभे करतील ते फलक किंवा वितरित करतील ते ती प्रसिद्धीपत्रके यांच्यावर प्रशासकाचे नाव, दूरध्वनी क्रमांक, छापण्यात आलेल्या पत्रकांची माहिती बिनचूक देणे अत्यावश्यक आहे.निवडणूक आयोगामार्फतच मतदान ओळखीसाठी संबंधित मतदारांना मतदान स्लिपचे वाटप करण्यात येणार आहे. एखाद्या उमेदवाराने किंवा पक्ष-आघाडीने मतदान स्लिप वाटायचे झाल्यास त्यावर उमेदवाराचे छायाचित्र, त्याचे नाव किंवा पक्षाचे चिन्ह वापरता येणार नाही. (प्रतिनिधी)सहा गावे व २४६ मतदान केंद्रेइचलकरंजी विधानसभा मतदारसंघात शहरासह सहा गावे आहेत. याठिकाणी एकूण २४६ मतदान केंद्रे असून, या मतदान केंद्रांवर १२३० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाईल. त्यापैकी एक मतदान केंद्र उपद्रवी व दोन ठिकाणे आर्थिकदृष्ट्या संवेदनशील असतील. मात्र, मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळी भरारी पथके तयार केली जातील, असेही निवडणूक निर्णय अधिकारी जिरंगे यांनी स्पष्ट केले.