शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

घटनादुरुस्तीनंतरही राज्य सरकारचे अधिकार अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 19:14 IST

Sambhaji Raje Chhatrapati Kolhapur- केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी १०२ व्या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारचे अधिकार बाधित होत नसल्याचे पुनःश्च स्पष्ट केले व तसे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या वतीने केले जाईल, असे आश्वस्त केले. खा. संभाजीराजे यांनी त्यांची सोमवारी भेट घेतली.

ठळक मुद्देसामाजिक न्यायमंत्री गेहलोत यांचे स्पष्टीकरण संभाजीराजे यांनी घेतली भेट

कोल्हापूर : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी १०२ व्या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारचे अधिकार बाधित होत नसल्याचे पुनःश्च स्पष्ट केले व तसे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या वतीने केले जाईल, असे आश्वस्त केले. खा. संभाजीराजे यांनी त्यांची सोमवारी भेट घेतली.

त्यांच्यासोबत मराठा संघटनांचे प्रतिनिधी राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव व शिष्टमंडळ उपस्थित होते. या भेटीमुळे महाराष्ट्रासह आरक्षणावर बाजू मांडण्यास सांगण्यात आलेल्या २६ राज्यांनाही दिलासा मिळणार आहे, असे खा. संभाजीराजे यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षण सुनावणीमध्ये १०२ व्या घटनादुरुस्तीमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी खा. संभाजीराजे यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत, राज्यमंत्री रामदास आठवले व राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांची एकत्रित भेट घेतली.सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षण सुनावणीमध्ये सध्या १०२ व्या घटनादुरुस्ती बाबतीत संदिग्धता निर्माण झाली आहे. राज्य मागासवर्ग आयोग व राज्य सरकारचे इतर मागास प्रवर्गातून आरक्षण देण्याचे अधिकार या घटनादुरुस्तीनंतर अबाधित आहेत की नाही, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

ही १०२ वी घटनादुरुस्ती होत असताना लोकसभेत घटनादुरुस्ती मंजूर झाल्यानंतर राज्यसभेमध्ये मंजूर करण्यापूर्वी सिलेक्ट कमिटी नेमली गेली, ज्यामध्ये २५ संसद सदस्यांच्या समितीपुढे हा विषय ठेवण्यात आला. या समितीने अहवालामध्ये १२ व्या मुद्यात या घटनादुरुस्तीमुळे राज्य मागासवर्ग आयोगांना मागास यादीमध्ये एखादा प्रवर्ग समाविष्ट करण्याचा अधिकार बाधित होत नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री गेहलोत यांनीदेखील राज्यसभेमध्ये बोलताना याबाबत असणारे राज्यांचे अधिकार काढून घेत नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री यांनी केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून, न्यायालयापुढेदेखील हे स्पष्ट करावे, अशा मागणीचे निवेदन यावेळी खासदार संभाजीराजे यांनी दिले. 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर