शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

वारणेचे हक्काचे पाणी मिळविणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:24 IST

इचलकरंजी : फसवेगिरी करणाऱ्या पुढाºयांच्या नादाला लागून वारणाकाठच्या नागरिकांनी पाण्याला नाही म्हणण्याचे पाप करू नये. त्यांचा नाद सोडून इचलकरंजीला पाणी देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करीत इचलकरंजीसाठी वारणा नदीतून हक्काचे पाणी मिळविणारच. त्यासाठी पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील. साशमवारचा मोर्चा हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है, असा इशाराही ...

इचलकरंजी : फसवेगिरी करणाऱ्या पुढाºयांच्या नादाला लागून वारणाकाठच्या नागरिकांनी पाण्याला नाही म्हणण्याचे पाप करू नये. त्यांचा नाद सोडून इचलकरंजीला पाणी देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करीत इचलकरंजीसाठी वारणा नदीतून हक्काचे पाणी मिळविणारच. त्यासाठी पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील. साशमवारचा मोर्चा हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है, असा इशाराही आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिला.शासनाच्या अमृत योजनेंतर्गत वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी वारणाकाठावरील नागरिकांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी इचलकरंजीतील सर्वपक्षीय नेत,े तसेच नागरिकांनी प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. त्यावेळी ते बोलत होते. पाण्यासाठी मोर्चामध्ये हजारो नागरिक, महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चाच्यावतीने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देण्यात आले.सुरुवातीला काविळीच्या साथीमध्ये बळी ठरलेल्या ४० नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.मोर्चासमोर बोलताना हाळवणकर म्हणाले, एखादा पुढारी उठतोय आणि पाणी नाही म्हणण्याचं पाप करतोय. चार लाख लोकसंख्या असलेल्या शहराला पाणी नाही म्हणणाºयांचा नायनाट होईल. गावकºयांनी त्यांचा नाद सोडावा आणि आम्हाला पाणी द्यावे. इचलकरंजीकरांच्या शांततेला नामुष्की समजू नये. प्रसंग पडल्यास कुदळ-फावडे आणि मागाचा लाकडी मारा घेऊन वारणा योजनेच्या भूमिपूजनाला दानोळीत आल्याशिवाय राहणार नाही. तरी आमचा अंत पाहू नका.नगराध्यक्षा अलका स्वामी म्हणाल्या, इचलकरंजीवासीयांना पाणी-पाणी करायला लावू नका. वारणा नदीतील पिण्यासाठी म्हणून आरक्षित असलेल्या पाण्यातील हक्काचे पाणी आम्ही मागत आहोत आणि ते मिळविल्याशिवाय गप्प बसणार नाही. पंचगंगा व कृष्णा नदी प्रदूषित झाली असल्याने इचलकरंजी शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड आम्हाला परवडणारी नाही. दूषित पाण्यामुळे सुमारे चाळीस हजार नागरिकांना काविळीची लागण झाली. त्यामध्ये चाळीस नागरिक मृत्युमुखी पडले. या सर्वांचा गांभीर्याने विचार करूनच शासनाने योजना मंजूर केली आहे. त्यामुळे हक्काचे पाणी आम्ही मिळविणारच.माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी, वारणेच्या पाण्यावर आमचा हक्क आहे. तो हक्क कसा बनतो, याबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत. पाण्यासाठी आमची नेहमी संयमाची भूमिका आहे. गरज पडल्यास संघर्षाची तयारीही आहे. कृष्णा नदीतून पाणी आणताना विरोध होता, तो झुगारून योजना राबविली. आता तर राजकारण विसरून एकत्र आलो आहोत. त्यामुळे वारणेतील पाणी आणणारच, असा निर्धार व्यक्त केला.यावेळी मदन कारंडे, दत्ता माने, पाणीपुरवठा सभापती नितीन जांभळे, अजित जाधव, आदींची भाषणे झाली. सर्वच वक्त्यांनी वारणा नदीतून पाणी मिळालेच पाहिजे, असा निर्धार व्यक्त केला. उपनगराध्यक्षा सरिता आवळे यांनी मोर्चात सहभागी झालेल्या शहरवासीयांचे आभार मानले.