शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

रिक्षाचालकांचे बजेट कोलमडले

By admin | Updated: January 8, 2016 00:51 IST

दोनशेचे झाले हजार : परवाना नूतनीकरण शुल्क पाचपटीने वाढले

कोल्हापूर : अ‍ॅटो रिक्षाचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी पूर्वी दोनशे रुपये शुल्क आकारणी प्रादेशिक परिवहनकडून केली जात होती. मात्र, नव्या बदलानुसार आता हेच शुल्क एक हजार रुपये इतके आकारले जाणार आहे. या बदलामुळे रिक्षाचालकांचे बजेटच कोलमडणार असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षा परवाना (परमिट) नूतनीकरणासह नवीन परमिट खरेदी करण्यासाठी दोनशेचे दहा हजार रुपये केल्याचा आदेश काढला आहे. या आदेशामुळे रिक्षाचालकांच्यात तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. हे शुल्क त्वरित रद्द न रद्द केल्यास आंदोलनाचा पवित्रा रिक्षाचालक घेणार आहेत. वाढती स्पर्धा आणि महागाईमुळे आधीच रिक्षाचालक बेजार झाले आहेत. यापूर्वी रिक्षा परमिट दोनशे रुपये इतके होते. त्यात पाचपटीने वाढ म्हणजे एक हजार रुपये इतके शुल्क वाढले आहे. याशिवाय रिक्षा परमिट नव्याने खरेदी करणेही बेरोजगारांना शक्य नाही. त्यात पूर्वी दोनशे रुपये इतके शुल्क आकारले जात होते. मात्र, तेच शुल्क दहा हजाराच्या घरात गेले आहे. टॅक्सीसाठीही हीच बाब आता वीस हजार रुपयांवर गेली आहे. या शुल्क वाढीने रिक्षा व टॅक्सीचालकांचे कंबरडेच मोडणार आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्णात १५ हजारांवर रिक्षा आहेत. (प्रतिनिधी)परवाना शुल्क वाढ अशी वाहनाचा प्रकारनवीन दरपूर्वीचे दर रिक्षा१०००२००मोटर कॅब१०००२००मॅक्सी कॅब१०००२००टप्पा वाहतूक दर१०००४००मालवाहतूक१०००६००पर्यटक कॅब२०००६००मोठी पर्यटक वाहने५००० ६००तडजोड शुल्कही वाढलेवाहन प्रकार परवाना तडजोड शुल्क निलंबनरिक्षा, मीटर टॅक्सी, लहान किमान दररोज पाच रुपये, मालवाहतूक वाहन१० दिवसकमाल दोन हजार रुपयेटूरिस्ट, आरामबस, टॅक्सी किमान दररोज तीस रुपये,१० दिवसकमाल पाच हजार रुपये प्रवासी वाहने, किमान दररोज ५० रुपये,मालवाहू वाहने१० दिवसकमाल दहा हजारांपर्यंत गणवेशही पांढरा होणारराज्य शासनाच्या गृहविभागाने आॅक्टोबर २०१५ मध्ये एका अध्यादेशाद्वारे राज्यातील आॅटो रिक्षाचालक व टॅक्सीचालक यांना पूर्वी वापरत असलेल्या ‘खाकी ’ गणवेशाऐवजी ‘पांढरा’ गणवेश वापरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता सर्वत्र रिक्षा आणि टॅक्सीचालकांचा गणवेश पांढरा दिसणार आहे. राज्य शासनाने रिक्षाचालकांचा व्यवसाय सध्या कसा चालला आहे, याचा सर्व्हे करावा. मग परमिट आदी शुल्कांमध्ये वाढ करावी, अन्यथा हा सार्वजनिक वाहतुकीला मदत करणारा व्यवसाय कोलमडून पडेल. टप्प्याटप्याने शुल्कात वाढ केली असती तर बरे झाले असते. -शिवाजी पाटील अध्यक्ष, विद्यार्थी वाहतूक संघटना