शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्ह्यातील चार हजार रिक्षा निघणार मोडीत, १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 11:02 IST

राज्य शासनाने वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या राज्यातील लाखो रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ३ हजार ९१६ इतक्या रिक्षा मोडीत निघणार आहेत. यातील बहुतांश रिक्षा बीएस- दोन या युरो मानांकनातील आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील चार हजार रिक्षा निघणार मोडीत, १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या रिक्षाबहुतांश रिक्षा बीएस-२ मानांकनाच्या; पर्यावरण ऱ्हास रोखण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : राज्य शासनाने वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या राज्यातील लाखो रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ३ हजार ९१६ इतक्या रिक्षा मोडीत निघणार आहेत. यातील बहुतांश रिक्षा बीएस- दोन या युरो मानांकनातील आहेत.प्रदूषण करणाऱ्या वाहनांमुळे वातावरणात कार्बन मोनोआॅक्साईड व कार्बन डायआॅक्साईड हे दोन विषारी वायू सोडले जातात. हे दोन वायू मानवी शरीरास घातक समजले जातात. त्यामुळे जागतिक तापमानातही वाढ होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून विकसनशील देशांमध्ये बीएस- ही युरो मानांकन करणारी वाहनांची श्रृंखला निर्माण करण्यात आली.

यात वातावरणात कमी प्रदूषण करतील अशा इंजिनांची निर्मिती वाहन उत्पादक कंपन्यांनी केली. त्यानुसार भारतात बी. एस. १ ते आतापर्यंत बी. एस. ६ इथपर्यंत मानांकनानुसार वाहने रस्त्यांवर धावू लागली. त्यात कमी प्रदूषण करणाऱ्या वाहनांची निर्मिती झाली. यातही मग पहिल्या मानांकनानुसार बनविण्यात आलेली आधीची वाहने अधिक प्रदूषण करीत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले.

त्यामुळे ती रस्त्यांवरून हटवून स्क्रॅप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील अशा प्रदूषण करणाऱ्या बी. एस. २ च्या रिक्षांचा समावेश यात करण्यात आला. त्यास अनुसरून राज्यात हा निर्णय घेण्यात आला. सर्वांत चांगला पर्याय म्हणून सीएनजी अर्थात कॉम्प्रेसिव्ह नॅचरल गॅसवर वाहने चालविणे अधिक सोईस्कर व पर्यावरणपूरक झाले आहे. याचाही विचार होणे गरजेचे असल्याचे मत अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.सन २०१३ साली मुंबई महानगर विकास प्राधिकरणाअंतर्गत येणाऱ्या ठाणे, पनवेल, नवी मुंबई, मुंबई या शहरांतील १६ आणि २० वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या रिक्षा स्क्रॅप करण्याचा पहिला निर्णय राज्य शासनाने घेतला. आता उर्वरित महाराष्ट्रात हा निर्णय लागू करण्यात आला आहे. कोल्हापूरचा विचार करता, आजमितीला तीन हजार ९१६ रिक्षांनी १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडली आहे. २०१९ पूर्ण होईपर्यंत २६४ रिक्षांची भर पडणार आहे; तर २०२० साल पूर्ण झाल्यानंतर त्यात आणखी १६३ रिक्षांची भर पडणार आहे. 

जिल्ह्यात आजमितीला १६ हजार ९७६ रिक्षा आहेत. त्यांपैकी तीन हजार ९१६ रिक्षांंनी १६ वर्षांची वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे या रिक्षा राज्य शासनाच्या निर्णयानुसार स्क्रॅप कराव्या लागणार आहेत. अशा रिक्षांच्या देखभाल -दुरुस्तीवरही अधिक खर्च होतो. शिवाय नवीन गाडी घेतल्यानंतर पर्यावरणाचा ºहास रोखण्यास मदत व प्रवाशांना आरामदायी प्रवासही मिळेल. त्यामुळे रिक्षाचालकांनी विचार करावा.- अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर

वाढत्या प्रदूषणाबाबत रिक्षाचालकांवरच गंडांतर का? इतर वाहनेही याच नियमानुसार स्क्रॅप करा. ज्या रिक्षा स्क्रॅप करणार त्यांना नवीन रिक्षा घेण्यासाठी शासनाने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे. अन्यथा हा लढा सुरूच राहील.- राजू जाधव, रिक्षाचालक सेना, जिल्हाप्रमुख 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर