शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नीटमध्ये कळंबा येथील साक्षीचे यश, कोल्हापूर शहरात रिभव जाधव प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 16:03 IST

वैद्यकीय अभ्याक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत ताराबाई पार्क येथील रिभव विलास जाधव याने ७२० पैकी ६४९ गुणांची कमाई करत कोल्हापूर शहरात गुरुवारी (दि. १५) प्रथम क्रमांक पटकविला. त्याने पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे.

ठळक मुद्दे नीटमध्ये कोल्हापूर शहरात रिभव जाधव प्रथम६४९ गुणांची कमाई : पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी

कोल्हापूर : वैद्यकीय अभ्याक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत ताराबाई पार्क येथील रिभव विलास जाधव याने ७२० पैकी ६४९ गुणांची कमाई करत कोल्हापूर शहरात गुरुवारी (दि. १५) प्रथम क्रमांक पटकविला. त्याने पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे.  या परीक्षेत कळंबा (ता. करवीर) येथील साक्षी सुनील महाडेश्वर हिने ५६२ गुणांसह यश मिळविले आहे. तिचे पर्सेंटाईल ९७ टक्के इतके आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील विविध २८ केंद्रांवर दि. १३ सप्टेंबर रोजी सुमारे १० हजार विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली. त्यामधील रिभव याने बाजी मारली आहे. त्याचे एकूण पर्सेंटाईल ९९.६९ टक्के असून त्यात फिजिक्ससाठी ९९.६ टक्के, केमिस्ट्रीला ९९.०६ टक्के, तर बायोलॉजीला ९९.८३ टक्के गुण आहेत. त्यांची ऑल इंडिया रँक ४०२४ अशी आहे. त्याने अतिग्रे येथील संजय घोडावत आयआयटी ॲड मेडिकल अकॅडमीच्या माध्यमातून या परीक्षेची तयारी केली.

गेली सहा महिने त्याने रोज १० ते १४ तास अभ्यास करून यश मिळविले आहे. त्याला अकॅडमीचे कोंडुती श्रीनिवास (वासू), श्रीधर गुप्ता, कोल्हापुरातील आर. एन. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. रिभव हा मुलांचे मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. विलास जा‌धव आणि आहारतज्ज्ञ डॉ. शिल्पा जाधव यांचा चिरंजीव आहे. दरम्यान, त्याने दहावीमध्ये ९५ टक्के, तर बारावीला ८५ टक्के गुण मिळविले होते. नीट परीक्षेतही त्याने कोल्हापूर शहरात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

अभ्यासातील सातत्य आणि शिक्षक, आई, वडील, बहीण आर्या यांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर यश मिळविले आहे. पहिल्यात प्रयत्नात यश मिळविल्याचा खूप आनंद होत आहे.- रिभव जाधव

 

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालkolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र