शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसणाऱ्यांना पाठविले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 12:14 IST

corona virus Kognolitoll Kolhapur- महाराष्ट्र व केरळ राज्यामध्ये वाढत असलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दोनच दिवसांपूर्वी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रमाणपत्र नसल्यास कर्नाटकात प्रवेश देणार नसल्याचे वक्तव्य केले होते त्यानुसार कर्नाटक शासनाच्या पोलिस प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र कर्नाटक आंतर राज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी इथून प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनांना परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे.

ठळक मुद्देकोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसणाऱ्यांना पाठविले परतकोगनोळी येथील आंतरराज्य सीमेवरून कर्नाटकात प्रवेश बंद

कोगनोळी : महाराष्ट्र व केरळ राज्यामध्ये वाढत असलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दोनच दिवसांपूर्वी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रमाणपत्र नसल्यास कर्नाटकात प्रवेश देणार नसल्याचे वक्तव्य केले होते त्यानुसार कर्नाटक शासनाच्या पोलिस प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र कर्नाटक आंतर राज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी इथून प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनांना परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे.आपल्या शेजारील राज्यांमध्ये वाढत असलेल्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कोगनोळी येथून कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना मज्जाव केला आहे त्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह जवळपास पन्नास कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.

हे कर्मचारी याठिकाणी येणाऱ्या वाहनधारकांकडून प्रमाणपत्राची विचारणा करत आहेत तसे प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनधारकांना कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यास मज्जाव घालून परत पाठीमागे महाराष्ट्रात पाठवून देत आहेत.  याठिकाणी डीवायएसपी मनोजकुमार नाईक, मंडल पोलीस निरीक्षक आय एस गुरुनाथ, पीएसआय बी एस तळवार यांच्या सह पन्नासहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtollplazaटोलनाकाKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूर