शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कारखान्यांचे १ कोटी परत, शेतकरी निवासासाठी घेतली होती रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 05:14 IST

कोल्हापूर : पुण्यातील साखर संकुलामध्ये राज्यभरातील साखर कारखान्यांना शेतकरी निवास कक्ष देण्यासाठी भरून घेतलेले एक कोटी सहा लाख रुपये संबंधित कारखान्यांना परत करण्याचा निर्णय साखर आयुक्तांनी घेतला आहे.

विश्वास पाटील कोल्हापूर : पुण्यातील साखर संकुलामध्ये राज्यभरातील साखर कारखान्यांना शेतकरी निवास कक्ष देण्यासाठी भरून घेतलेले एक कोटी सहा लाख रुपये संबंधित कारखान्यांना परत करण्याचा निर्णय साखर आयुक्तांनी घेतला आहे. त्यानुसार १२ कारखान्यांना आरटीजीएसद्वारे ही रक्कम परतही करण्यात आली आहे. ‘लोकमत’मध्ये १२ आॅक्टोबरच्या अंकात त्यासंबंधीचे वृत्त प्रसिद झाले होते. त्याची दखल घेऊन पैसे परत करण्याची प्रक्रिया त्याच दिवसापासून गतीने करण्यात आली.पुण्यात कृषी महाविद्यालयाच्या ७ एकरांवर साखर संकुलाची उभारणी करण्यात आली. तीन एकरांवर शेतकरी निवास, अधिकारी निवासस्थाने व कारखान्यांसाठी कक्ष बांधण्यात येणार होते. त्यासाठी मंत्री समितीच्या २००५च्या बैठकीत कारखान्यांकडून निधी जमा करण्याचा निर्णय झाला. देखभालीसाठी म्हणून साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ट्रस्टची स्थापना करण्यात आली; परंतु कृषी विद्यापीठाने जागा देण्यास नकार दिला. ज्या कामासाठी ट्रस्टची स्थापना केली ते कामच न राहिल्याने ट्रस्ट बरखास्त करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला; २००५पासूनचे लेखापरीक्षणाचे अहवाल व चेंज रिपोर्ट सादर करण्याची सूचना धर्मादाय आयुक्तांनी केली. ती प्रक्रिया सुरू आहे. त्याचदरम्यान ९ आॅगस्ट २०१७ला कारखान्यांचा निधी परत करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले; प्रत्यक्षात पैसे परत दिलेले नव्हते.‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच साखर आयुक्त कार्यालयातून संबंधित कारखान्यांना फोन आले व कागदपत्रांची पूर्तता करण्याची सूचना देण्यात आली.>व्याजाची अडचणट्रस्ट स्थापन करताना त्याला सामाजिक कारणावरून आयकर सवलत मिळाली होती; तो उद्देशच पूर्ण न झाल्याने जमा केलेल्या निधीवर आयकर विभागास तब्बल एक कोटी रुपये भरावे लागले. त्यामुळे कारखान्यांना फक्त मुद्दलच परत करण्यात येत आहे.